मुंबई : मागच्या काही दिवसांपासून राज्यात वीजेचा तुटवडा आहे. काही भागात तर वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे नागरिक (Citizens) देखील त्रस्त आहेत. अर्थातच विजेच्या तुटवड्याची झळ शिक्षण क्षेत्रालासुद्धा (Education Sector) बसणारच. याच संदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा (Announcement) केलीये. ही घोषणा त्यांनी ट्विटरवर केलीये. जितक्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा असतील त्यांचा वीज पुरवठा कधीही खंडीत होणार नाही याची व्यवस्था आम्ही (प्रशासनाने) केली आहे अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलीये. वीज बिलापोटी यावर्षी शासनाने 14 कोटी रुपये दिले आहेत. अर्थमंत्री अजित पवार यांनी आणखी निधी लागला तर पुरवणी मागणी दाखल करून ती मंजूर करण्याचे आश्वासन दिलंय. याशिवाय शाळेला कोणत्या सवलतीच्या दरात वीज पुरवठा मिळावा यासाठीही प्रशासन प्रयत्न करत आहे असंही त्या म्हणाल्या.
Let there be light! The Maharashtra government has decided that schools in the state will get uninterrupted power supply. We are also working on a policy for subsidised electricity for schools. #education pic.twitter.com/Vhf8lBMaJf
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) April 19, 2022
अखेर राज्यातील शाळांना अखंड वीजपुरवठा करण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलाय. शाळांना अनुदानित वीज देण्याच्या धोरणावर सुद्धा सरकार काम करतंय. या निर्णयामुळे आता शिक्षण क्षेत्राला तरी खंडीत वीजपुरवठ्याचा सामना करावा लागणार नाही अशी अशा सर्वच स्तरांतून व्यक्त केली जातीये. सध्या कोळशाचा प्रचंड तुटवडा आहे. वीज निर्मिती केंद्रावर दोन ते तीन दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध आहे. अशातच शिक्षणमंत्र्यांनी केलेली ही घोषणा अत्यंत महत्त्वाची असल्याचं म्हटलं जातंय. या निर्णयाचं स्वागत आणि कौतुकही केलं जातंय.
राज्यातील 689 शाळांचे वीजबिल थकल्यामुळे त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यानंतर हे वीजबिल भरल्याचेही राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात महावितरणकडे बिल भरणा झालेला नाही. तरीही यासाठीची रक्कम देण्यात आली असून त्वरीत वीज जोडणी द्यावी, असे सांगण्यात आले आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलीये. तसेच वीज बिल थकबाकीमुळे राज्यातील जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्था, मनपा आणि इतर कोणत्याही शाळांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही, अशी माहितीदेखील वर्षा गायकवाड यांनी दिलीये. औरंगाबादमधील सातारा गावातील जिल्हा परिषद शाळेत शाळा पूर्वतयारी अभियानातील पहिले पाऊल या राज्यस्तरीय मेळाव्यात त्या बोलत होत्या.
इतर बातम्या :