GATE Exam 2022 नवी दिल्ली : अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या गेट 2022 परीक्षेच्या अर्जात दुरुस्ती करण्यास मुदतवाढ देण्यात आलीय. अभियांत्रिकी पदवी परीक्षा (GATE) 2022 साठी नोंदणी केलेले विद्यार्थी gate.iitkgp.ac.in या वेबसाईटवर भेट देऊन अर्जात दुरुस्ती करु शकतात. गेट परीक्षा देणारे विद्यार्थी 15 नोव्हेंबरपर्यंत अर्जात सुधारणा करु शकतात.
आयआटी खरगपूरकडे गेट आयोजनाची जबाबदारी
गेट अर्जात सुधारणा करण्यासाठी आयआयटी खरगपूरच्या gate.iitkgp.ac.in या वेबसाईटवर लिंक उपलब्ध आहे. अर्जात सुधारणा करण्यासाठी विद्यार्थ्यांना लॉगीन करावं लागेल. अर्जात प्रवर्ग, पेपर, परीक्षा केंद्र शहर यासह इतर माहितीमध्ये सुधारणा करता येईल.
स्टेप 1 : गेट 2022 च्या gate.iitkgp.ac.in या वेबसाईटला भेट द्या.
स्टेप 2 : या लिंकवर उमेदवार लॉगीन पेज ओपन होईल, तिथं नोंदणी क्रमांक, ईमेल आयडी आणि पासवर्ड नोंदवा
स्टेप 3 : यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज उपलब्ध होईल. यामध्ये अर्जात सुधारणा करुन पुन्हा अर्ज जतन करा.
स्टेप 4 : अपडेट केलेल्या अर्जाची प्रत प्रिंटआऊट करा.
GATE 2022 परीक्षा 05 फेब्रुवारी, 06 फेब्रुवारी, 12 फेब्रुवारी आणि 13 फेब्रुवारी 2022 रोजी घेण्यात येईल.आयआयटी खरगपूरने कोरोना विषाणू संसर्गामुळं परीक्षांच्या तारखा बदलल्या जाऊ शकतात.
आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी आणि सीएफटीआय संस्थांच्या एम.ई. / एम.टेक / पीएचडी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गेट ही परीक्षा घेण्यात येते. देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये (पीएसयू) भरतीसाठीही गेट स्कोअरचा वापर केला जातो. 2021 च्या गेट परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआटी मुंबईकडं देण्यात आली होती.
इतर बातम्या:
GATE Exam 2022 : गेट परीक्षा नोंदणीसाठी शेवटची संधी, रजिस्ट्रेशन कसं करायचं?
GATE Exam 2022 : गेट परीक्षेच्या नोंदणीला पुन्हा मुदतवाढ, आता ‘या’ तारखेपर्यंत रजिस्ट्रेशनची संधी
GATE Exam 2022 : गेट परीक्षेच्या तारखा जाहीर, ‘इथे’ पाहा वेळापत्रक
GATE 2022 online application correction dates extended till15 November