GATE Exam 2022 नवी दिल्ली : अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या गेट 2022 परीक्षेची नोंदणी करण्याचा आजचा अखेरचा दिवस आहे. अभियांत्रिकी पदवी परीक्षा (GATE) 2022 साठी नोंदणी gate.iitkgp.ac.in या वेबसाईटवर करण्यात येईल. गेट परीक्षा जे विद्यार्थी देऊ इच्छितात ते आयआयटी खरगपूरच्या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती घेऊ शकतात. तर गेट परीक्षा 2022 मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. परीक्षा अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढील माहितीसाठी गेटच्या वेबसाईटला भेट देणं आवश्यक आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूरने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली होती. उमेदवारांनी गेट परीक्षेची अधिकृत नोटिफिकेशन वाचल्याशिवाय अर्ज करु नये, असं आवाहन करण्यात आलंय. गेट 2022 साठी नवीन वेबसाईटवर सविस्तर नोटिफिकेशन आयआयटी खरगपूरकडून जारी करण्यात आलं आहे. तसेच, GATE 2022 च्या परीक्षेची व्याप्ती वाढवण्यात आलीय. BDS आणि M. Pharm पदवी असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2021
विलंब शुल्कासह अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 ऑक्टोबर 2021
अर्जामध्ये सुधारणा – 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2021
श्रेणी आणि परीक्षेचे शहर बदलण्याची शेवटची तारीख – 3 जानेवारी 2022
GATE परीक्षेच्या प्रस्तावित तारखा – 5, 6, 12 आणि 13 फेब्रुवारी 2022
निकाल जाहीर होण्याची तात्पुरती तारीख – 17 मार्च 2022
गेट 2022 नोंदणीची प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करावी लागेल. GATE 2022 च्या माहितीसाठी gate.iitkgp.ac.in वर भेट द्यावी लागेल. विद्यार्थी गेट परीक्षेच्या एक किंवा दोन पेपरसाठी अर्ज करू शकतात. परंतु, अर्ज फक्त एकच भरावा लागणार आहे. विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त अर्ज भरले असतील तर त्यापैकी फक्त एक स्वीकारला जाईल इतर बाकीचे रद्द केले जातील. मात्र, त्यांचे शुल्क देखील परत केले जाणार नाही.
एससी, एसटी, दिव्यांग आणि सर्व महिला उमेदवारांसाठी गेट अर्ज शुल्क : 750 रुपये
लेट फीसह: 1250 रुपये
इतर सर्व उमेदवारांसाठी अर्ज फी : 1500 रुपये
विलंब फीसह 2000 रुपये
GATE 2022 परीक्षा 05 फेब्रुवारी, 06 फेब्रुवारी, 12 फेब्रुवारी आणि 13 फेब्रुवारी 2022 रोजी घेण्यात येईल.आयआयटी खरगपूरने कोरोना विषाणू संसर्गामुळं परीक्षांच्या तारखा बदलल्या जाऊ शकतात.
आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी आणि सीएफटीआय संस्थांच्या एम.ई. / एम.टेक / पीएचडी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गेट ही परीक्षा घेण्यात येते. देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये (पीएसयू) भरतीसाठीही गेट स्कोअरचा वापर केला जातो. 2021 च्या गेट परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआटी मुंबईकडं देण्यात आली होती.
इतर बातम्या:
NEET 2021 : नीट परीक्षेसाठी दोन टप्प्यांत करा रजिस्ट्रेशन; जाणून घ्या नवे बदल
GATE 2022 online application last date today check details at gate.iitkgp.ac.in