भावी इंजिनीअर्ससाठी ही बातमी महत्त्वाची आहे. ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग म्हणजेच GATE 2025च्या फॉर्ममध्ये 10 नोव्हेंबरपर्यंत दुरुस्ती करता येणार आहे. यापूर्वी फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्याची तारीख ही 6 नोव्हेंबरपर्यंत होती. मात्र, आता या तारखेत वाढ करण्यात आली असून ही मुदत 4 दिवसांसाठी वाढविण्यात आली आहे.
GATE 2025 यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. ते गेट 2025 gate2025.iitr.ac.in च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी क्रमांकासह लॉगिन करू शकतात आणि फॉर्ममध्ये दुरुस्ती करू शकतात.
GATE 2025 च्या फॉर्ममध्ये विद्यार्थी आपले नाव, जन्म तारीख, परीक्षेचे शहर, विषय आणि त्यांची श्रेणी सुधारू शकतात. अधिक माहितीसाठी आयआयटी रुरकीने जारी केलेली नोटीस पाहू शकता.
IIT रुरकीने फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्याची तारीख वाढविण्यासंदर्भात एक नोटीस देखील जारी केली आहे. ही नोटीस विद्यार्थी तपासू शकतात. अधिकृत अधिसूचनेत म्हटले आहे की, 31 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2024 दरम्यान उमेदवार अर्ज दुरुस्तीसाठी GOAPS (goaps.iitr.ac.in) मध्ये लॉग इन करू शकतात.
अर्जात सुधारणा करण्यासाठी उमेदवारांना 500 रुपये शुल्क म्हणजेच फी भरावी लागणार आहे. जर उमेदवाराला एससी, एसटीमधून इतर कोणत्याही प्रवर्गात जायचे असेल तर त्यांना 1400 रुपये शुल्क भरावे लागेल.
आधी तुम्ही GATE 2025च्या gate2025.iitr.ac.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
होम पेजवर दिलेल्या GATE 2025 टॅबवर क्लिक करा
रजिस्ट्रेशन नंबर वगैरे डिटेल्स टाकून लॉगिन करा
फॉर्ममध्ये दुरुस्ती करून शुल्क जमा करा
GATE 2025 ची परीक्षा 1, 2, 15 आणि 16 फेब्रुवारी 2025 रोजी दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे.
GATE 2025 ही परीक्षा CBT पद्धतीने 3 तास चालणार आहे. GATE 2025 चे प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट 2 जानेवारी 2025 रोजी जारी केले जाईल. 19 मार्च 2025 रोजी निकाल जाहीर होणार आहे. ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणार आहे. आम्ही तुम्हाला GATE 2025 या परीक्षेची सर्व माहिती दिली आहे. आता तुम्ही वेळेपूर्वीच तुमच्या फॉर्ममध्ये दुरुस्ती करू शकतात. कारण, ऐनवेळी गोंधळ उडायला नको.