SSC HSC Results: धक धक करने लगा? जून महिन्यात धोधो निकाल बरसणार! निकाल पाहण्यासाठी या गोष्टी आधी पाठ करून ठेवा

| Updated on: Jun 08, 2022 | 1:37 PM

पण त्या त्या आठवड्यात कुठल्याही दिवशी अचानक रिझल्ट लागू शकतो.जेव्हा महाराष्ट्र बोर्ड निकालाची घोषणा करेल तेव्हा निकाल अधिकृत संकेतस्थळांव्यतिरिक्त इतर काही खासगी संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येणार आहे.

SSC HSC Results: धक धक करने लगा? जून महिन्यात धोधो निकाल बरसणार! निकाल पाहण्यासाठी या गोष्टी आधी पाठ करून ठेवा
जून महिन्यात धोधो निकाल बरसणार!
Image Credit source: facebook
Follow us on

12 वी चा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा

10वी आणि 12वीचा रिझल्ट (10th and 12th Result) जून 2022 मध्ये लागणार आहे. पालक आणि शिक्षकवर्ग या निकालाकडे लक्ष देऊन आहेत. तुम्हाला कुणाचाही 10 आणि 12वी दोन्हीचा रिझल्ट अगदी सहज बघता येणार आहे. यासाठी तुम्हाला फक्त ज्या विद्यार्थ्याचा रिझल्ट चेक करायचा आहे त्याचा रोल नंबर, आईचं नाव माहित असायला हवं. 12वीचा निकाल जूनच्या दुसऱ्या आणि 10वीचा शेवटच्या आठवड्यात (Second And Last Week Of June) लागणार आपल्याला फक्त इतकीच माहिती उपलब्ध आहे. पण त्या त्या आठवड्यात कुठल्याही दिवशी अचानक रिझल्ट लागू शकतो. जेव्हा महाराष्ट्र बोर्ड निकालाची घोषणा करेल तेव्हा निकाल अधिकृत संकेतस्थळांव्यतिरिक्त इतर काही खासगी संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येणार आहे. 10वी आणि 12वीचा निकाल www.mahahsscboard.in च्या संकेतस्थळावर रिझल्टच्या दिवशी मिळेल. निकाल पाहण्यासाठी ही प्रोसेस फॉलो करा…

महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल कसा पाहायचा

रिझल्ट चेक करताना काय महत्त्वाच्या बाबी

  1. महाराष्ट्र बोर्ड 10वी किंवा 12वी निकाल वेबसाईट
  2. संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी सीट नंबर वेगवेगळे आहेत हे लक्षात घ्या.
  3. सीट नंबर आणि आईचं नाव या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी
  4. सीट नंबर काही कारणाने चुकला तर आईच्या नावाने रिझल्ट चेक करता येणार आहे
  5. आईचं नाव काही कारणानं चुकलं किंवा अजून काही गडबड झाली तरी सीट नंबरने सुद्धा रिझल्ट चेक करता येणार आहे

अकरावी प्रवेशाचा दुसरा टप्पा रिझल्ट लागल्यावरच

दरम्यान अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरु झालीये. त्यासाठी विद्यार्थ्यांना मॉक अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेत. हे अर्ज दोन टप्प्यात भरता येणार आहेत. या दोन टप्प्यापैकी दुसरा टप्पा दहावीचा रिझल्ट लागल्यावरच भरता येणार आहे.