CUET PG Answer Key 2022 अंतिम उत्तर की डाउनलोड कशी करणार?

| Updated on: Sep 24, 2022 | 5:48 PM

यापूर्वी 16 सप्टेंबर रोजी एनटीएकडून तात्पुरती उत्तर की देण्यात आली होती, ज्यावर विद्यार्थ्यांनी आपले आक्षेप नोंदवले होते.

CUET PG Answer Key 2022 अंतिम उत्तर की डाउनलोड कशी करणार?
CUET PG Answer Key
Image Credit source: Social Media
Follow us on

National Testing Agency (NTA) ने Common University Entrance Test Postgraduate 2022 (CUET PG 2002) साठी अंतिम उत्तर की जाहीर केली आहे. 1 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर 2022 दरम्यान घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेच्या सर्व शिफ्टसाठी सीयूईटी पीजी अंतिम उत्तर की जाहीर करण्यात आली आहे. सीयूईटी cuet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन विद्यार्थी अंतिम उत्तर की डाउनलोड करू शकतात. यापूर्वी 16 सप्टेंबर रोजी एनटीएकडून तात्पुरती उत्तर की देण्यात आली होती, ज्यावर विद्यार्थ्यांनी आपले आक्षेप नोंदवले होते.

तात्पुरत्या उत्तरावर नोंदवलेल्या आक्षेपानंतर सीयूईटी पीजी 2022 च्या प्रश्नपत्रिकेतून अनेक प्रश्न काढून टाकण्यात आले आहेत, ज्याचे गुण सर्व विद्यार्थ्यांना दिले जातील असं एनटीएने CUET PG आन्सर की प्रसिद्ध करताना म्हटले आहे.

विद्यार्थ्यांना अंतिम उत्तर की च्या गुणांवरून ज्या विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा त्याचा अंदाज बांधता येतो. यावरून त्यांना कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो, याचा अंदाज बांधता येतो. म्हणून अंतिम उत्तर की महत्त्वाची असते.

सीयूईटी पीजी अंतिम उत्तर की 2022

सीयूईटी पीजी अंतिम उत्तर की 2022 कशी डाउनलोड करणार

  • cuet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या
  • यानंतर होम पेजवर देण्यात आलेल्या CUET PG Answer Key 2002 च्या डाऊनलोड लिंकवर क्लिक करा.
    आता CUET PG Answer Key आपल्या स्क्रीनवर दिसेल.
  • CUET PG Answer Key डाउनलोड करून घ्या आणि गुणांची तपासणी करा