जून 2022 च्या दुसऱ्या आठवड्यात बारावीचा निकाल लागणार अशी माहिती मागच्याच आठवड्यात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी दिली होती. त्यामुळे आता विद्यार्थी आणि पालकवर्ग सगळ्यांचं लक्ष या निकालाकडे (Results) लागून होतं. वास्तविक पाहता यावेळी बारावीच्या परीक्षेपासूनच अनेक अडचणींचा सरकारला, विद्यार्थ्यांनी आणि पालकवर्गाला सामना करावा लागतोय. मग त्यात शिक्षकांनी पेपर चेकिंगवर (Paper Checking) टाकलेला बहिष्कार असो, विद्यार्थ्यांचं परीक्षा ऑफलाईन घ्या असं म्हणत केलेलं आंदोलन असो. इतक्या सगळ्या अडचणीत सुद्धा निकाल वेळेत लावण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिलंय. हा निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर www.mahahsscboard.in बघायला मिळणार आहे.
कोरोना ही जागतिक समस्या, तिचा जर जगावर परिणाम झालाय तर विद्यार्थ्यांच्या परफॉर्मन्सवर देखील होणारच. कोरोनासारख्या महामारीनंतर विद्यार्थ्यांचा निकाल, राज्यातल्या एकूणच निकालाची परिस्थिती यासाठी हा निकाल खास आहे. या सगळ्याचा मिळून परिणाम पुढच्या शिक्षणासाठीच्या प्रवेशांवर होणार आहे. निकालाचं काहीही होऊ पण पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेताना काही बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे. निकालानंतर अर्थातच तुम्ही महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी तयारी सुरु करणार. कुठल्या पदवीसाठी शिक्षण घ्यायचं याचा विचार तर आत्तापासून करणं गरजेचंच आहे पण प्रवेशासाठी काय कागदपत्र गरजेची असतात हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. प्रवेश कुठच्याही पदवीसाठी असू खालील कागदपत्रं ही अत्यंत महत्त्वाची आहेत.