पुणे : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला आहे. सकाळी ११ वाजता बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकालाची माहिती दिली. यंदा बारावी बोर्डाचा निकाल मागील वर्षापेक्षा कमी लागला आहे. यंदाच्या निकाल 91.25 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात 2.97 टक्क्यांनी घट झाली आहे. आता या निकालानंतर काय करावे, कोणत्या अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावा, कोणत्या संधी उपलब्ध आहेत? या प्रश्नाची उत्तरे एका चार्टमधून मिळेल.
कोणती अभ्यासक्रम आहेत उपलब्ध
बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता प्रवेश प्रक्रिया सुरु होईल. अनेक विद्यार्थी कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. तर, अनेक विद्यार्थी पारंपारिक विद्याशाखांना प्रवेश घेण्याऐवजी नवीन वाटा शोधत असतात. त्यांच्यासाठी सोबत दिलेला चार्ट उपयोगी पडणार आहे.
विद्यार्थ्यांनी बारावीपर्यंतचं शिक्षण वाणिज्या शाखेतून घेतल्यानंतर पुढं देखील वाणिज्य शाखेची निवड करणं त्यांच्या करिअरसाठी महत्वाचं ठरु शकतं. बारावीनंतर विद्यार्थी फायनान्स, अकाऊंटिंग, टॅक्सेशन, ऑडिटींग, गुंतवणूक क्षेत्र, विमा क्षेत्र, बँक असं मोठं क्षेत्र वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी खुलं आहे.
भारतात गेल्या काही वर्षांपासून पर्यटन आणि हॉस्पिटलिटीसह हॉटेल इंडस्ट्री वाढत आहे. यामुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटलटी क्षेत्र सातत्यानं वाढत असल्यानं या क्षेत्रात करिअरच्या चागंल्या पगाराच्या संधी निर्माण होत आहेत. देश सेवेसाठी इच्छूक असणारे तरुण 12 वी किंवा ग्रॅज्युएशननंतर सैन्यदलात दाखल होऊन देशसेवा करु शकतात, असे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.