CA नोव्हेंबर परीक्षा 2023 संदर्भात ICAI कडून महत्त्वाची नोटीस जारी

| Updated on: Feb 08, 2023 | 5:03 PM

नोंदणी करण्यापूर्वी उमेदवारांनी जारी केलेली अधिकृत अधिसूचना वाचावी. या संदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जारी केलेली नोटीस पाहू शकतात.

CA नोव्हेंबर परीक्षा 2023 संदर्भात ICAI कडून महत्त्वाची नोटीस जारी
CA exam 2023
Image Credit source: Social Media
Follow us on

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) सीए नोव्हेंबर परीक्षा 2023 साठी पात्रता निकषांवर एक महत्त्वपूर्ण सूचना जारी केली आहे. आयसीएआयच्या icai.org अधिकृत संकेतस्थळावर उमेदवारांना अधिकृत नोटीस उपलब्ध आहे. अधिकृत सूचनेनुसार, सीए इंटरमीडिएट आणि अंतिम परीक्षेला बसणारे विद्यार्थी सध्याच्या शिक्षण आणि प्रशिक्षण योजनेंतर्गत घेतले जातील.

दरम्यान, ICAI मे, जूनच्या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. विलंब शुल्काशिवाय ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी आहे. उमेदवारांना 600 रुपये विलंब शुल्कासह 3 मार्चपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.

त्याचबरोबर 4 मार्च 2023 ते 10 मार्च 2023 या कालावधीत उमेदवार आपल्या नोंदणीत दुरुस्ती देखील करू शकतात. नियोजित शेवटच्या तारखेनंतर दुरुस्ती करता येत नाही.

नोंदणी करण्यापूर्वी उमेदवारांनी जारी केलेली अधिकृत अधिसूचना वाचावी. या संदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जारी केलेली नोटीस पाहू शकतात.

उमेदवार या लिंकवर क्लिक करून NOTICE तपासू शकतात.

ICAI CA नोव्हेंबर परीक्षा 2023 तारीख कशी तपासावी

  • सर्वप्रथम icai.org अधिकृत संकेतस्थळावर जा
  • ICAI CA नोव्हेंबर परीक्षा 2023 च्या होम पेजवर दिलेल्या अधिकृत सूचना लिंकवर क्लिक करा.
  • एक नवीन PDF फाइल उघडेल, जिथे उमेदवार तपशील तपासू शकतात.
  • डिटेल्स तपासा आणि प्रिंट आऊट घ्या.