नवी दिल्ली: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस ऑफ इंडियानं जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या सीए फाऊंडेशन आणि फायनल परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार याच्या तारखा जाहीर केल्या आहेत. फायनल आणि फाऊंडेशन जुना आणि नवा अभ्यासक्रम परीक्षा जुलै महिन्यात आयोजित करण्यात आली होती. आयसीएआयनं 13 आणि 14 सप्टेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचं कळवलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली असेल ते विद्यार्थी आयसीआयच्या icai.org.in या वेबसाईट भेट देऊन निकाल पाहू शकतात.
आयसीएआयनं जारी केलेल्या नोटिफिकेशनद्वारे उमेदवारांना निकाल ईमेलद्वारे उपलब्ध करुन देण्याचं जाहीर केलं आहे. ज्या उमेदवारांना निकाल ईमेलद्वारे हवा असेल त्यांना 11 सप्टेंबर 2021 पासून icai.org वर नोंदणी करावी लागेल. सीए फायनल परीक्षेच्या जुन्या आणि नव्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना निकाल ईमेलद्वारे उपलब्ध करुन दिले जातील.
Important Announcement – Results of the Chartered Accountants Final Examination(Old course & New Course) & Foundation Examination held in July 2021 are likely to be declared on Monday, 13th September 2021(evening)/Tuesday, 14th September 2021
Detailshttps://t.co/5Cua8SZ57D pic.twitter.com/PZhFNCYgp2— Institute of Chartered Accountants of India – ICAI (@theicai) September 10, 2021
>>> सर्वात आधी icaiexam.icai.org , caresults.icai.org किंवा icai.nic.in या वेबसाईटवर जा
>>> यानंतर होमपेजवर आल्यानंतर Latest notification वर क्लिक करा
>>> त्यानंतर CA Result 2021 या ऑप्शनवर क्लिक करा
>>> त्यानंतर तुमजा रजिस्ट्रेशन नंबर, चार अंकी पिन नंबर आणि रोल नंबर टाका
>>> तुम्ही सर्व माहिती भरल्यानंतर ICAI CA Final किंवा CA Foundation परीक्षेचा निकाल दिसेल
>>> निकालाची गरज भविष्यात पडू शकते. त्यामुळे तुमचा निकाल डाऊनलोड करा
ICAI CA Foundation, Final (old New Course) Result SMS द्वारे पाहा
सीए फाऊंडेशन आणि फायनल परीक्षेचा निकाल एसएमएसद्वारे पाहता येईल. फाऊंडेशनचा निकाल पाहण्यासाठी CAFND_ (सहा अंकी परीक्षा क्रमांक) टाकून 57575 वर पाठवून द्या. तुम्हाला तुमचा निकला एसएमएसद्वारे मिळेल.
निकालासंबंधी तक्रार कशी नोंदवणार
विद्यार्थ्यांना जर सीए फाऊंडेशन निकालाबद्दल शंका असेल तर तो ICAI CA पोर्टलवर तक्रार नोंदवू शकतो. आयसीएआयनं विद्यार्थ्यांना foundation_examhelpline@icai.in, intermediate_examhelpline@icai.in या ईमेल आयडीवर तक्रार नोंदवण्यास सांगितलं आहे.
इतर बातम्या:
ICAI CA result 2021 | सीए इंटर परीक्षेच्या निकाल जाहीर, icai org वर पाहा तुमचा रिझल्ट
ICAI CA Result Jan 2021 : सीए फाऊंडेशन आणि फायनल परीक्षेचा रिझल्ट जाहीर, ‘असा’ पाहा मोबाईलवर निकाल
Rajasthan Forts : इतिहासाचे साक्षीदार असलेले राजस्थानमधील 5 ऐतिहासिक किल्ले; तुम्ही अवश्य भेट द्या
ICAI Result 2021| सीए इंटर परीक्षेच्या निकालाची तारीख ठरली, icai org वर पाहा तुमचा रिझल्ट
ICAI declared result dates of CA July 2021 exam has been released Candidates can check the result at official website icai.org.