ICSE, ISC Board Exams 2021 नवी दिल्ली: कॉऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स म्हणजेच सीआयएसीईने आयसीएसई आणि आयसीएस बोर्ड परीक्षा 2021 सेमेस्टर 1 परीक्षेसाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सेमिस्टर 1 वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उमेदवार cisce.org वर CISCE च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन संपूर्ण वेळापत्रक पाहू शकतात. ICSE आणि ISC या दोन्हीसाठी सेमेस्टर एकची परीक्षा 15 नोव्हेंबरपासून सुरू होईल. दहावीची परीक्षा 6 डिसेंबरला संपले तर बारावीची परीक्षा 16 डिसेंबरला संपणार आहे.
दहावीच्या परीक्षा दररोज सकाळी 11 वाजता सुरू होतील आणि परीक्षेचा कालावधी 1 तास असेल. बारावीची परीक्षा दररोज दुपारी 2 वाजता सुरू होईल आणि परीक्षेचा कालावधी 1.5 तास असेल. उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी वेळापत्रकात नमूद केलेल्या वेळेव्यतिरिक्त प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 15 मिनिटे देण्यात आली आहेत.
विद्यार्थी खाली दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करून वेळापत्रक डाउनलोड करू शकतात.
स्टेप 1: सर्वप्रथम cisce.org च्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.
स्टेप 2: वेबसाइटवर दिलेल्या वेळापत्रकाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3: तुमच्या स्क्रीनवर PDF उघडेल.
स्टेप 4: आता तुम्हाला वेळापत्रक दिसेल.
स्टेप 5: आता तपासा आणि डाउनलोड करा
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने यूजीसी नेट परीक्षा 2021 साठी डिसेंबर 2020 आणि जून 2021 मधील अर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना एक संधी उपलब्ध करुन दिली आहे. एनटीए यूजीसी नेट परीक्षेच्या वेबसाईटवर अर्जात सुधरणा करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही सुविधा 7 सप्टेंबर 2021 रोजी सुरु करण्यात आली असून 12 सप्टेंबर 2021 पर्यंत सुरु राहील. जे उमेदवार अर्जामध्ये बदल करू इच्छितात ते UGC NET च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर भेट देऊन दुरुस्ती करू शकतात.
अर्जात सुधारणा करण्याची सुविधा 12 सप्टेंबर, 2021 रोजी बंद होईल. विहित मुदत संपल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत एनटीएकडून कडून सुधारणा करण्याची संधी दिली जाणार नाही. अर्जामध्ये सुधारणा करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना क्रेडिट/डेबिट कार्ड/नेट बँकिंग/यूपीआय किंवा पेटीएम वॉलेटद्वारे ऑनलाइन दुरुस्तीसाठी अतिरिक्त शुल्क भरणे आवश्यक आहे.अर्जात सुधारणा करण्याची सुविधा केवळ त्या उमेदवारांना उपलब्ध आहे ज्यांनी 6 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी आवश्यक शुल्कासह अर्ज यशस्वीरीत्या सादर केला आहे. एनटीएने ही केवळ एक वेळची सुविधा दिली असल्याने, उमेदवारांनी सुधारणा करताना सावधगिरी बाळगली पाहिजे, असं आवाहन करण्यात आलं आहे.
इतर बातम्या
NET Exam 2021: एनटीएकडून नेट परीक्षेच्या तारखांमध्ये बदल, नवं वेळापत्रक जाहीर
UGC NET 2021 Exam: JRF च्या वयोमर्यादेसंदर्भात मोठा निर्णय, NTA कडून नोटिफिकेशन जारी
ICSE, ISC Board Exams 2021 CISCE released Semester 1 time table at cisce.org check details here