JoSAAने आज मॉक सीट अलॉटमेंट 2022 ची दुसरी फेरी जाहीर केलीये. उमेदवार josaa.nic.in या अधिकृत वेबसाइटवर त्यांचे जागा वाटप तपासू शकतात. त्याचबरोबर ऑनलाईन JoSAA नोंदणी 21 सप्टेंबर रोजी बंद होणार आहे. यंदा शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी सेंट्रलाइज्ड जागा वाटप प्रक्रियेसाठी ऑनलाइन नोंदणीचे काम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, राऊरकेला (NIT Rourkela) यांच्याकडे देण्यात आले आहे, त्यामुळे NITs, IIEST, IIITs, SPAs आणि GFTI मध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.
“उमेदवारांनी जागा वाटप प्रक्रिया समजून घेणे खूप महत्वाचे आहे, कारण थोड्याशा गडबडीमुळे, NIRFच्या सर्वोच्च दर्जाचं कॉलेज त्याच्या हातातून जाऊ शकतं. वेळीच ऑनलाइन फी भरणे किंवा ऑनलाइन कागदपत्र पडताळणी झाली नाही तर उमेदवाराला आपली जागा गमवावी लागू शकते.”
विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी बहुभाषिक हेल्पलाइन डेस्क (09124121003) उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना तमिळ, तेलुगू, मल्याळम, बंगाली, मराठी, उडिया आणि इंग्रजी या भाषांमध्ये मदत दिली जाणार आहे. उमेदवारांना नोंदणीपासून जागा वाटपापर्यंत माहिती मिळू शकते.