मराठीच नाही तर अहिराणी आणि उर्दू भाषेतही मोफत ऑनलाईन शिक्षण, जळगावमध्ये ‘व्ही – स्कूल’ अ‍ॅपचं उद्घाटन

| Updated on: Aug 16, 2021 | 12:09 AM

जळगाव जिल्हा परिषद व पुण्यातील 'वोपा' या सामाजिक संस्थेच्या एकत्रित प्रयत्नातून 'व्ही - स्कूल' या ऑनलाईन टिचिंग लर्निंग अ‍ॅपचं आज (15 ऑगस्ट) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले.

मराठीच नाही तर अहिराणी आणि उर्दू भाषेतही मोफत ऑनलाईन शिक्षण, जळगावमध्ये व्ही - स्कूल अ‍ॅपचं उद्घाटन
Follow us on

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत, मात्र अशा परिस्थितीतही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबू नये म्हणून जळगावमध्ये अनोखा प्रयोग करण्यात आलाय. जळगाव जिल्हा परिषद व पुण्यातील ‘वोपा’ या सामाजिक संस्थेच्या एकत्रित प्रयत्नातून ‘व्ही – स्कूल’ या ऑनलाईन टिचिंग लर्निंग अ‍ॅपचं आज (15 ऑगस्ट) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. विशेष म्हणजे या अ‍ॅपमध्ये केवळ मराठीच नाही, तर अहिराणी आणि उर्दू भाषेतही मुलांना अभ्यासक्रम उपलब्ध करुन देण्यात आलाय. त्यामुळे मुलांना आपल्या मातृभाषेत शिक्षण घेताना कोणताही अडथळा येणार नाही. असा प्रयोग करणारं हे वैशिष्ट्यपूर्ण अ‍ॅप ठरलंय.

“या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षण मिळणार”

या अ‍ॅपचं उद्घाटन करताना जळगावचे पालकमंत्री आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी काळाची पावले ओळखून जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी सुरु केलेला ऑनलाईन व्ही-स्कूल (V-School Learning, Teaching System) प्रकल्प कौतुकास्पद असल्याचे गौरोवोद्वार काढले.

ते म्हणाले, “चांगले उपक्रम राबविण्यासाठी जळगाव जिल्हा नेहमीच आघाडीवर असतो. जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा व्ही-स्कुल हा उपक्रम याचेच उदाहरण आहे. लॉकडाऊनमुळे ऑनलाईन शिक्षण पध्दती गरजेची झाली आहे. याचबरोबर भविष्यात ऑनलाईन शिक्षणाला महत्व प्राप्त होणार असल्याने या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षण मिळणार आहे.” व्ही-स्कूल प्रकल्प स्थानिक बोली भाषेत उपलब्ध करुन देण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

1ली ते 10वी मराठी, सेमी इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासक्रम

ऑनलाईन शिक्षण ही काळाची गरज आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षीपासून शाळा बंद होत्या. अशावेळी विद्यार्थ्यांची शिक्षणाची गरज ऑनलाईन शिक्षण पध्दतीमुळे पूर्ण होण्यास मदत झाली आहे. लवकरच शाळा ऑफलाईन सुरु होणार असल्या तरी हा उपक्रम उपयुक्त असल्याचे मत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केलं.

‘वोपा’ या संस्थेचे संचालक प्रफुल्ल शशिकांत यांनी यावेळी एका चित्रफितीद्वारे जळगावच्या शिक्षकांचे मनोगत, त्यांनी तयार केलेला अभ्यासक्रम उपस्थितांसमोर मांडला. 1ली ते 10वी मराठी, सेमी इंग्रजी व माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘व्ही – स्कूल’ या अ‍ॅपवरून मोफत अभ्यास साहित्य पुरवले जाते. तसेच, आता जळगावच्या व उर्दू माध्यमाच्या शिक्षकांच्या मदतीने उर्दू अभ्यासक्रमही तयार केला जात आहे.

जिल्हाभरातील 550 हून अधिक शिक्षकांसाठी विशेष कार्यशाळा

जिल्हाधिकारी व शिक्षण विभागाच्या मदतीने ‘वोपा’ या सामाजिक संस्थेने जिल्हाभरातील 550 हून अधिक शिक्षकांसाठी ऑनलाइन शैक्षणिक साहित्य तयार करण्याच्या कार्यशाळा आयोजित केल्या होत्या. त्यामध्ये शिक्षकांनी सहभाग घेतला व व्हिडीओज, पीपीटी, गुगल फॉर्मचा वापर करून अभ्यास साहित्य निर्मिती केली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, अकलाडे, ‘वोपा’ टीम उपस्थित होते.

‘व्ही – स्कूल’ हे मोफत अ‍ॅप कसं डाऊनलोड कराल?

https://play.google.com/store/apps/details?id=com.vopa.app

हेही वाचा :

Photos | ‘शाळा बंद, मात्र शिक्षण सुरु’, वोपाकडून महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन शिक्षण

दहावीच्या संपूर्ण वर्षात दवाखान्याच्या फेऱ्या, कॅन्सरशी झुंज देणाऱ्या स्नेहालयच्या हिनाचा निर्धार पूर्ण

ऑनलाईन शिक्षणाचा ‘व्हीस्कूल पॅटर्न’, महाराष्ट्रातील दहावीच्या लाखो विद्यार्थ्यांना मोफत

व्हिडीओ पाहा :

Inauguration of V School App in Jalgaon for free Online education