नवी दिल्ली : भारतीय तटरक्षक दलाची (Indian Coast Guard) स्थापना शांततेच्या काळात म्हणजेच युद्ध सुरु नसतानाच्या वेळी भारतीय समुद्र (Indian Sea) किनाऱ्यांचं रक्षण करण्याच्या हेतूनं करण्यात आली. भारतीय संसदेनं(Parliament) 18 ऑगस्ट 1978 रोजी तटरक्षक अधिनियम 1978 या कायद्याला मंजुरी दिली होती. भारतीय तटरक्षक दलाचं वयम रक्षाम हे ब्रीदवाक्य आहे. सध्या अनिराग गोपालन थपलियाल हे त्याचे प्रमुख आहेत.18 ऑगस्ट 1978 ला संसदेनं मंजुरी दिली असली तरी भारताच्या सागरी सीमांचं रक्षण करण्यासाठी नवीन सशस्त्र सुरक्षा दल म्हणून याची सुरुवात 1 फेब्रुवारी 1977 ला झाली होती. भारतीय नौदलाचं काम हे युद्धकालीन असावं आणि युद्ध सुरु नसताना सागरी सीमांची जबाबदारी तटरक्षक दलाकडे असावी या भूमिकेतून याची स्थापना करण्यात आली. अमेरिकेच्या तटरक्षक दलाच्या धर्तीवर भारतीय तटरक्षक दल स्थापन करण्यात आलं.
भारतीय तटरक्षक दलाच्या स्थापनेसाठी सप्टेंबर 1974 मध्ये के.एफ. रुस्तमजी यांच्या अध्यक्षतेखाली सागरी तस्करांना प्रतिबंध करण्यासाठी तटरक्षक दलासारख्या संघटनेच्या स्थापनेसाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीनं तटरश्रक दलाची स्थापना करण्याची सूचना केली. तटरक्षक दल भारतीय युद्धाचा काळ सुरु नसताना सागरी सीमांचं सरक्षण करण्याचं काम करेल. 25 ऑगस्ट 1976 ला भारत सागरी क्षेत्र अधिनियम मंजूर झाला. भारतानं 2.01 लाख वर्ग किलोमीटर सागरी क्षेत्रावर मालकी सांगितली. यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळानं 1 फेब्रुवारी 1977 ला तटरक्षक दलाची स्थापना करण्याचा निर्णय घण्यात आला. भारतीय संसदेनं 18 ऑगस्ट 1978 ला भारतीय तटरक्षक अधिनियम 1978 मंजूर करुन तटरक्षक दलाच्या स्थापनेला मंजुरी दिली
भारतीय तटरक्षक दल आपल्या सागरी सीमांमध्ये येणारी कृत्रिम बेटे, सागरी भागातील संस्था आणि इतर गोष्टींच्या संरक्षणाची कामगिरी पार पाडतं. भारतीय मच्छीमारांना सुरक्षा देणं, समुद्रात मासेमारी करताना संकट आल्यास त्यांची मदत करणे. सागरी प्रदूषणाचं निवारण आणि नियंत्रणासह सागरी पर्यावरण आणि संरक्षण करणे. तस्करी विरोधी अभियानं चालवणे. भारतीय सागरी कायद्यांची अंमलबजावणी करणे.
भारतीय तटरक्षक दलाचं मुख्यालय राजधानी नवी दिल्ली येथा आहे. प्रशासकीय सोयीसाठी आणखी 5 विभागीय कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे. पश्चिम क्षेत्राचं विभागीय कार्यालय मुंबई येथे आहे. पूर्व क्षेत्राचं विभागीय कार्यालय चेन्नईला आहे. तर, उत्तर पूर्व क्षेत्राचं कार्यालय कोलकाता, अंदमान आणि निकोबारचं कार्यालय पोर्टब्लेअर आणि उत्तर पश्चिम क्षेत्राचं कार्यालय गांधीनगर गुजरातला आहे.
इतर बातम्या:
Nagpur Students | नागपुरात दहावी-बारावीचे विद्यार्थी रस्त्यावर; बसच्या काचा फोडण्याचे कारण काय?
Mooknayak : काय करु आता धरुनिया भीड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक का सुरु केलं?
Indian Coast Guard Foundation day check history and responsibility of ICG here