JEE Advanced 2021 नवी दिल्ली: जेईई अॅडव्हान्सड परीक्षेची नोंदणी प्रक्रिया नुकतीच संपली आहे. जेईई अॅडव्हान्सड परीक्षेचं प्रवेशपत्र उद्या सकाळी 10 वाजता अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर अपलोड केले जातील. जेईई मेन्स परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांनी जेईई अॅडव्हान्सड परीक्षेसाठी नोंदणी केलेली आहे. परीक्षेचे हे प्रवेशपत्र (IIT JEE Admit Card 2021) परीक्षेच्या दिवशी 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत डाऊनलोड करता येईल. ही परीक्षा भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (IITs) अभियांत्रिकी आणि आर्किटेक्चर आणि नियोजन अभ्यासक्रमांमधील प्रवेश प्रक्रियेसाठी घेतली जाईल.
स्टेप 1: सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर भेट द्या .
स्टेप 2: वेबसाइटवर दिलेल्या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3: आता लॉगिन करा.
स्टेप 4: तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
स्टेप 5: ते आता डाउनलोड करा.
स्टेप 6: परीक्षा हॉलमध्ये नेण्यासाठी त्याची प्रिंट आउट घ्या.
जेईई मेन 2021 परीक्षा उत्तीर्ण करणारे 2.5 लाख विद्यार्थी जेईई अॅडव्हान्सड 2021 परीक्षेसाठी पात्र असतील. देशातील आयआयटी संस्थातील प्रवेशासाठी ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा 3 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे. परीक्षेपासून निकालापर्यंतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
नोंदणी प्रक्रिया सुरु : 15 सप्टेंबर 2021
नोंदणीची शेवटची तारीख : 20 सप्टेंबर 2021
प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची तारीख : 25 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2021
परीक्षेची तारीख : 3 ऑक्टोबर 2021
जेईई अॅडव्हान्सड परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. पहिली शिफ्ट पेपर एक साठी असेल जी सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत असेल. दुसऱ्या शिफ्टमध्ये पेपर दोन दुपारी 2.30 ते 5.30 या वेळेत घेण्यात येईल. अधिक माहितीसाठी संबंधित तपशीलांसाठी उमेदवार जेईई अॅडव्हान्सडच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या गेट 2022 परीक्षेची नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थी 28 सप्टेंबरपर्यंत नोंदणी करु शकतात. अभियांत्रिकी पदवी परीक्षा (GATE) 2022 साठी नोंदणी gate.iitkgp.ac.in या वेबसाईटवर करण्यात येईल. गेट परीक्षा जे विद्यार्थी देऊ इच्छितात ते आयआयटी खरगपूरच्या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती घेऊ शकतात. तर गेट परीक्षा 2022 मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. परीक्षा अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढील माहितीसाठी गेटच्या वेबसाईटला भेट देणं आवश्यक आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूरने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 28 सप्टेंबर करण्यात आला आहे. उमेदवारांनी गेट परीक्षेची अधिकृत नोटिफिकेशन वाचल्याशिवाय अर्ज करु नये, असं आवाहन करण्यात आलंय. गेट 2022 साठी नवीन वेबसाईटवर सविस्तर नोटिफिकेशन आयआयटी खरगपूरकडून जारी करण्यात आलं आहे. तसेच, GATE 2022 च्या परीक्षेची व्याप्ती वाढवण्यात आलीय. BDS आणि M. Pharm पदवी असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार आहे.
JEE Advanced 2021 Admit Card To Be Released Tomorrow Check here how to download