इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई (IIT Bombay) जेईई ॲडव्हान्स्ड 2022 (JEE Advanced 2022) परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे. jeeadv.ac.in अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, जेईई ॲडव्हान्स्ड ॲडमिट कार्ड (JEE Advanced Admit Card) उद्या म्हणजेच 23 ऑगस्टपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. जेईई मेन 2022 ची परीक्षा बी.ई. आणि B.Tech पेपरमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाईल. आयआयटी मुंबई जेईई ॲडव्हान्स परीक्षा घेण्यासाठी सज्ज झाली आहे.
आयआयटी मुंबईने दिलेल्या वेळापत्रकानुसार, उमेदवार जेईई ॲडव्हान्स्ड ॲडमिट कार्ड 2022 रिलीज झाल्यानंतर डाउनलोड करू शकतात. त्यांना प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची संधी 28 ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजेपर्यंत मिळणार आहे. आयआयटी जेईईची परीक्षा सकाळ आणि दुपार अशा दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. सकाळच्या शिफ्टच्या परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत, तर दुपारच्या शिफ्टच्या परीक्षा दुपारी 2.30 ते 5.30 या वेळेत होणार आहेत. जेईई ॲडव्हान्स्डचा निकाल 11 सप्टेंबरपर्यंत जाहीर होऊ शकतो, असे मानले जात आहे.
ॲडमिट कार्ड जाहीर झाल्यानंतर ते तपासण्यासाठी ॲडमिट कार्ड लिंक अधिकृत वेबसाइटवर ॲक्टिव्हेट केली जाणार आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना काही स्टेप्स फॉलो करून ॲडमिट कार्ड डाऊनलोड करता येणार आहे. प्रवेशपत्राशी संबंधित सर्व प्रकारच्या अपडेट्ससाठी विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट तपासत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.