JEE Advanced 2022: आज जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा! केंद्रावर जाण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं

| Updated on: Aug 28, 2022 | 9:04 AM

या परीक्षेला बसायला जाणाऱ्या उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत, त्या पाळणे आवश्यक आहे. जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया 08 ऑगस्ट 2022 पासून सुरू झाली. त्यासाठी 11 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती.

JEE Advanced 2022: आज जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा! केंद्रावर जाण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं
Skill development course in IIT
Image Credit source: Social Media
Follow us on

आज 28 ऑगस्ट, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस. जेईई ॲडव्हान्स्ड (JEE Advanced) परीक्षा आज घेण्यात येणार आहे. जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई म्हणजेच आयआयटी मुंबई (IIT Bombay) यांच्यातर्फे दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. यानुसार पहिल्या शिफ्टचा पेपर सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर पेपर 2 ची परीक्षा दुपारी 2 ते 5 या वेळेत होणार आहे. त्याचबरोबर या परीक्षेला बसायला जाणाऱ्या उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत, त्या पाळणे आवश्यक आहे. जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया 08 ऑगस्ट 2022 पासून सुरू झाली. त्यासाठी 11 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्याचे ॲडमिट कार्ड (Admit Card) 23 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध झाले होते. परीक्षेचा निकाल 11 सप्टेंबर 2022 रोजी जाहीर होईल.

या गोष्टी परीक्षा केंद्रावर घेऊन जा

  1. जेईई ॲडव्हान्स्ड ॲडमिट कार्डची प्रिंटआऊट
  2. पासपोर्ट साइज फोटो
  3. वैध फोटो आईडी प्रूफ
  4. पीडब्ल्यूडी प्रमाणपत्र

परीक्षा केंद्रांवर हे नियम पाळा

  • उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र फोटो आयडी प्रुफसह परीक्षा केंद्रावर घेऊन जावे लागेल.
  • उमेदवारांनी त्यांच्या जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेच्या शिफ्टची वेळ काळजीपूर्वक तपासावी आणि परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचावे.
  • कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्राच्या आत कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.
  • डिजिटल घड्याळे, दागिने, पेन, नोटपॅड आणि फोन यासारख्या गोष्टींवर परीक्षा हॉलमध्ये पूर्णपणे बंदी असेल.
  • प्रचंड रहदारी किंवा गर्दी टाळण्यासाठी उमेदवारांना किमान 90 मिनिटे आधी जेईई ॲडव्हान्स्ड 2022 परीक्षा केंद्रावर पोहोचावे लागेल.
  • परीक्षा संपण्यापूर्वी उमेदवाराला परीक्षा केंद्र सोडता येणार नाही.
  • परीक्षा केंद्र सोडतानाही कोविड-19 ची परिस्थिती पाहता सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे.

जेईई ॲडव्हान्स्डच्या महत्त्वाच्या तारखा

  • जेईई ॲडव्हान्स्ड ॲडमिट कार्ड- 23 अगस्त 2022 (टेंटेटिव्ह)
  • पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी पेपर रायटरची निवड- 27 ऑगस्ट 2022
  • प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख- 28 ऑगस्ट 2022
  • जेईई ॲडव्हान्स्ड 2022 परीक्षेची तारीख- 28 ऑगस्ट 2022
  • जेईई ॲडव्हान्स्ड रिस्पॉन्स शीट – 1 सप्टेंबर 2022
  • प्रोव्हिजनल उत्तर की- 3 सप्टेंबर 2022
  • उत्तर की आक्षेपाची शेवटची तारीख – 4 सप्टेंबर 2022
  • अंतिम उत्तर की- 11 सप्टेंबर 2022
  • जेईई ॲडव्हान्स्ड रिझल्ट 2022- 11 सितंबर 2022 (टेंटेटिव्ह)

1.6 लाख उमेदवार

जेईई मेन परीक्षा एनटीएने घेतली होती. या परीक्षेसाठी सुमारे 9 लाख जणांनी अर्ज केले होते. त्याचबरोबर जेईई मेन्सचा निकालही लागला आहे. निकालानंतर जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा देण्यासाठी 2.6 लाख उमेदवार पात्र ठरले. मात्र, यातील केवळ 1.6 लाख विद्यार्थ्यांनी ॲडव्हान्ससाठी नोंदणी केली.