Jee Main Result 2021: जेईई मेन चौथ्या सत्राची परीक्षा संपली; निकाल ‘या’ तारखेपर्यंत जाहीर होणार

| Updated on: Sep 02, 2021 | 7:14 PM

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात येणाऱ्या JEE MAIN 2021 च्या चौथ्या सत्राची परीक्षा आज पार पडली. 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2021 जेईई मेन चौथ्या सत्राची परीक्षा आयोजित करण्यात आली.

Jee Main Result 2021: जेईई मेन चौथ्या सत्राची परीक्षा संपली; निकाल या तारखेपर्यंत जाहीर होणार
JEE Main
Follow us on

Jee Main Result 2021 नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात येणाऱ्या JEE MAIN 2021 च्या चौथ्या सत्राची परीक्षा आज पार पडली. 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2021 जेईई मेन चौथ्या सत्राची परीक्षा आयोजित करण्यात आली. जेईई मेन परीक्षेचा निकाल 11 सप्टेंबर पूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. jeemain.nic.in आणि nta.ac.in या वेबसाईटवर निकाल जाहीर केला जाईल.  परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी निकाल आणि पुढील अपडेटसाठी वेबसाईटला भेट द्यावी.

जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षेसाठी पहिले अडिच लाख विद्यार्थी पात्र

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात येणारी चौथ्या सत्राची जेईई मेन परीक्षा कोरोना संसर्गामुळं लांबणीवर टाकली गेली होती. देशातील 7.32 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. भारतातील 334 परीक्षा केंद्र आणि भारताबाहेरील 12 शहरांमध्ये ही परीक्षा पार पडली. जेईई मेन परीक्षेतील टॉप अडीच लाख विद्यार्थी जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत.

ज्या विद्यार्थ्यांनी एक पेक्षा अधिक सत्राची परीक्षा दिली असेल त्यांचं सर्वाधिक गुण ग्राह्य धरली जातील. चौथ्या सत्राच्या निकालासोबत एनटीए ऑल इंडिया रँक आणि प्रवर्ग निहाय कट ऑफ लिस्ट जारी करेल. जेईई अॅडव्हान्सड परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. तिचा निकाल 15 ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाईल. जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार आर्किटेक्चर अ‌ॅप्टिट्यूड टेस् आयोजित केली जाईल.

सुमुपदेशन कधी सुरु होणार?

आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी आणि इतर सरकारी अनुदानित तांत्रिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी समुपदेशन जेईई अ‌ॅडव्हान्सड एएटी परीक्षेच्या निकालानंतर सुरू होईल. जेईई मेन परीक्षा चौथ्या सत्राचा निकाल jeemain.nic.in आणि nta.ac.in या वेबसाईटवर निकाल जाहीर केला जाईल.

जेईई मेन 2021 सत्र 4 चा कसा पाहायचा?

स्टेप 1: निकाल तपासण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर भेट द्या.
स्टेप 2: वेबसाइटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3: तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करून लॉगिन करा.
स्टेप 4: तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
स्टेप 5: निकाल डाऊनलोड करुन त्याची प्रिंट आऊट घ्या

मातृभाषेत परीक्षा

नव्या शिक्षण धोरणानुसार जेईई मेन 2021 सत्राची परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेसह तेलुगू, तामिळ, पंजाबी, उर्दू, ओडिशा, मराठी, मल्याळम, कन्नड, बंगाली, आमामी आणि गुजराती भाषेमध्ये घेतली जात आहे.

जेईई मेन परीक्षा

जेईई मेन ही राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा आहे. पदवीस्तरावरील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) JEE मुख्य परीक्षा आयोजित करते.

इतर बातम्या:

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका, नेमकं प्रकरण काय?

एकनाथ खडसेंच्या वाढदिवशी जयंत पाटलांचं आगळंवेगळं गिफ्ट, जळगाव जिल्ह्यातील सिंचन योजनेचा शुभारंभ

पंकजाताई, तुमची लेकरं परदेशात शाळेत अन् आमची कायम उसाच्या फडात, पंकजा मुंडे म्हणतात…

JEE Main 2021 Session 4 Result exam completed Expected Before This Date