JEE Main 2022: जेईई मेन 2022 (JEE Main 2022) सत्र 2 च्या ऑनलाइन अर्जामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या तपशीलांमध्ये बदल करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. विद्यार्थी आता आपल्या अर्जामध्ये बदल करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना हे बदल करायचे आहेत ते जेईई मेनच्या अधिकृत संकेतस्थळावर (Official Website)जाऊन करू शकतात. जेईई मेनच्या अधिकृत संकेतस्थळावर करेक्शन विंडो चालू करण्यात आलेली आहे. अर्जात सुधारणा कारण्यासाठी ही करेक्शन विंडो (Correction Window) 3 जुलै 2022 रोजी रात्री 11.50 पर्यंत खुली ठेवली जाणार आहे.
अधिकृत संकेतस्थळ- जेईई मेन JEE jeemain.nta.nic.in
NTA ने जारी केलेल्या अधिकृत नोटीसमध्ये म्हटले आहे की, “जेईई मेन 2022 सत्र 2 च्या ऑनलाइन अर्जामध्ये तुमचे तपशील संपादित/बदलण्याची संधी देण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी विनंत्या केल्या. प्रचंड प्रमाणात होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) विद्यार्थ्यांना JEE मेन 2022 सत्र 2 च्या ऑनलाइन अर्जामध्ये त्यांच्या माहितीमध्ये बदल करण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. एनटीएचा हा निर्णय त्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा ठरला आहे ज्यांना त्यांच्या अर्जात बदल करायचे आहेत.
NTA त्यांना अशी दुसरी संधी देणार नाही अशी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, त्यांनी सर्व बदल एकाच वेळी केले आहेत याची खात्री केली पाहिजे. क्रेडिट / डेबिट कार्ड / नेट बँकिंग / UPI आणि पेटीएम द्वारे कोणतीही अतिरिक्त फी (जेथे लागू असेल) संबंधित विद्यार्थी भरू शकतो.
संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य (JEE Main) 2022 सत्र 2 (जुलै 2022)साठी अर्ज पुन्हा चालू करण्यात येणार आहेत असं NTA ने जाहीर केलंय