JEE Main 2022: जेईई मेन 2022 पेपर 2 साठीचं ॲडमिट कार्ड आलंय, डाउनलोड करून घ्या!

| Updated on: Jul 26, 2022 | 12:09 PM

या नोटीसमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की जेईई मेन्स प्रवेशपत्र 2022 हे दोन्हीसाठी आहे - जे उमेदवार सत्र 2 मध्ये बी.आर्च, बी.प्लॅनिंगसाठी आणि जे उमेदवार भारताबाहेर अभियांत्रिकी आणि आर्किटेक्चर प्रवेश परीक्षा देत आहेत.

JEE Main 2022: जेईई मेन 2022 पेपर 2 साठीचं ॲडमिट कार्ड आलंय, डाउनलोड करून घ्या!
JEE
Image Credit source: Social Media
Follow us on

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency), एनटीए नॅशनल टेस्टिंग एजन्सी, एनटीएने संयुक्त प्रवेश परीक्षा, जेईई मेन 2022 पेपर 2 साठी 25 जुलै 2022 रोजी प्रवेशपत्र ऑनलाईन जाहीर केले आहे. जेईई मेन्स 2022 सत्र 2 च्या पेपर 2 साठी नोंदणी केलेले उमेदवार आता jeemain.nta.nic.in, nta.ac.in अधिकृत वेबसाइटवरून (Official Website) आपले प्रवेशपत्र डाउनलोड (Download Admit Card) करू शकतात. ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठीच्या स्टेप्स आणि डायरेक्ट लिंक इथे शेअर केल्या आहेत. पेपर २ साठी जारी करण्यात आलेल्या जेईई मेन 2022 प्रवेशपत्रास एनटीएने अधिकृत सूचनेद्वारे सूचित केले आहे. या नोटीसमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की जेईई मेन्स प्रवेशपत्र 2022 हे दोन्हीसाठी आहे – जे उमेदवार सत्र 2 मध्ये बी.आर्च, बी.प्लॅनिंगसाठी आणि जे उमेदवार भारताबाहेर अभियांत्रिकी आणि आर्किटेक्चर प्रवेश परीक्षा देत आहेत.

ॲडमिट कार्ड 2022 कसे डाउनलोड करावे

वेळापत्रकानुसार, जेईई मेन 2022 पेपर 2 30 जुलै 2022 रोजी आयोजित केला जाईल, तथापि, भारताबाहेर जेईईची परीक्षा देणार् या उमेदवारांसाठी पेपर 1 28 आणि 29 जुलै 2022 रोजी घेण्यात येईल. स्टेप बाय स्टेप गाईडच्या माध्यमातून उमेदवार ॲडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतात.

जेईई मेन ॲडमिट कार्ड 2022 कसे डाउनलोड करावे

  • संयुक्त प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम jeemain.nta.nic.in अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • वेबसाइटच्या होमपेजवर तुम्हाला “रिलीझ ऑफ ॲडमिट कार्ड्स फॉर द पेपर 2 अँड कँडिडेट्स ऑफ आऊटसाईड इंडिया फॉर जॉईंट एन्ट्रन्स एगझामिनेशन (मेन)- 2022 सेशन 2 (जुलै 2022)” ही लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, इथे तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि जन्मतारीख टाकून सबमिट करू शकता.
  • आता तुमचं ॲडमिट कार्ड समोरच्या स्क्रीनवर असेल. आता तुम्ही त्याची प्रिंट आऊट काढून डाउनलोड करू शकता.

जेईई मेन 2022 च्या प्रवेशपत्रावरील अधिकृत नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, “उमेदवारांना वेबसाइटवरून जेईई (मुख्य) – 2022 सत्र 2 जुलै 2022 त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख वापरुन प्रवेशपत्र डाउनलोड करावे लागेल.”