नवी दिल्ली : जेईई मेन (JEE Main 2022 Exam) जून सत्रासाठी 2022 साठीचे प्रवेशपत्र (Admit Card) जाहीर करण्यात आलंय. 20 ते 23 जून दरम्यान घेण्यात येणारी ही परीक्षा पुढे ढकलून 23 जून पासून घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. विद्यार्थी आपलं प्रवेशपत्र https://jeemain.nta.nic.in अधिकृत वेबसाइटवरून डाऊनलोड करू शकतात. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency) सिटी इन्टिमेशन स्लिप जारी केलीये. विद्यार्थी अधिकृत वेबसाईटवर जाऊन सिटी इन्टिमेशन स्लिप डाऊनलोड करू शकतात. इन्टिमेशन स्लिपमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा शहरांची माहिती मिळू शकते. एनटीएने परीक्षांची तारीख सुद्धा बदलली आहे.
एनटीएने परीक्षेची तारीख 20 जून ते 23 जून 2022 पर्यंत वाढवली होती. एनटीएने जारी केलेल्या पत्रकानुसार जेईई मेन 2022 ची प्रवेश परीक्षा आता उद्यापासून म्हणजेच 23 जून 2022 पासून घेण्यात येणार आहे. जेईई मेन २०२२ च्या पहिल्या सत्राच्या परीक्षा 23,24,25,26,27, 28 आणि 29 जून रोजी होणार आहेत. यापूर्वी ही परीक्षा 20 ते 29 जून 2022 या कालावधीत होणार होती. एनटीएतर्फे जेईई मेन 2022 सत्र 1 विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. देशभरातील 501 शहरे आणि भारताबाहेरील 22 शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे.