दोन्ही सत्रांची जेईई मेन्सची (JEE Mains) परीक्षा संपली आहे. सत्र 1 चा निकाल यापूर्वीच जाहीर झाला आहे. आता सत्र 2चा निकाल (JEE Mains Session 2) जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. परीक्षेला बसलेले विद्यार्थी निकाल जाहीर होण्याची वाट पाहत आहेत. रिपोर्टनुसार, 6 ऑगस्टपर्यंत निकाल जाहीर केला जाऊ शकतो. एनटीएने सध्या जेईई मेन्सच्या निकालाची (JEE Mains Results) तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही, मात्र दोन दिवसांत निकालाची तारीखही जाहीर होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. लवकरच उमेदवारांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. एनटीए jeemain.nta.nic.in अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई मेन्स सेशन 2 परीक्षेसाठी आन्सर की जाहीर केली आहे. या परीक्षेला बसणारे विद्यार्थी jeemain.nta.nic.in अधिकृत वेबसाइटवर जाऊन ते डाउनलोड करू शकतात. आन्सर की डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख (Birth Date) टाकावी लागणार आहे. त्यानंतर, उमेदवार आन्सर की डाउनलोड करू शकतात. जे उमेदवार या आन्सर की वर समाधानी नाहीत ते उमेदवार 5 ऑगस्टपर्यंत संध्याकाळी 5 वाजता उत्तर कीवर आक्षेप नोंदवू शकतात. आन्सर की डाउनलोड केल्यानंतर उमेदवार आपले गुण मोजू शकतात. अर्जदार 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत जाहीर केलेल्या आन्सर की विरूद्ध आक्षेप नोंदवू शकतात. उमेदवारांना प्रति चॅलेंज 200 रुपये शुल्क भरावे लागेल.