नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (JNU) शनिवारी रात्री पुन्हा चर्चेत आलं होतं. यावेळी आनंद पटवर्धन यांची राम के नाम (Ram Ke Naam) ही डॉक्युमेंटरी दाखवण्यावरुन वाद निर्माण झाला होता. विद्यापीठ प्रशासनानं राम के नाम दाखवण्यास विरोध केला होता. जवाहलाल नेहरु विद्यापीठ विद्यार्थी यूनियनची (JNUSU) अध्यक्ष आईषी घोष (Aishe Ghosh) हिनं जेएनयूएसयूच्या ऑफिसमध्ये डॉक्युमेंटरी दाखवण्यापासून विद्यापीठ रोखू शकत नाही, अशी भूमिका घेतली होती. अखेर जेएनयूएसयूच्या कार्यालयाबाहेर शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थित राम के नाम ही डॉक्युमेंटरी शांततेत कोणत्याही वादाशिवाय दाखवण्यात आली. आईषी घोष हिनं या संदर्भातील ट्विट केलं आहे.
Hundreds of students have gathered outside JNU Students’ Union office for the screening of’Ram Ke Naam’. pic.twitter.com/zzSusqZRak
— Aishe (ঐশী) (@aishe_ghosh) December 4, 2021
जेएनयूएसयूनं राम के नाम डॉक्युमेंटरी शनिवारी दाखवण्याचं जाहीर केल्यानंतर वादाला सुरुवात झाली होती. विद्यापीठ प्रशासनानं विद्यार्थी यूनियनला डॉक्यूमेंटरी दाखवू नये असं कळवलं होतं. विद्यापीठ प्रशासनानं अनधिकृत उपक्रमांमुळे सामाजिक धार्मिक बंधुभाव आणि शांतेतच्या वातावरणाला धक्का बसेल, असं म्हटलं होतं. मात्र, जेएनयूएसयूनं विद्यापीठ प्रशासनाचा विरोध धुडकावून लावत शनिवारी रात्री 9 वाजता राम के नाम डॉक्युमेंटरी दाखवली.
जवाहरलाल नेहरु विद्यापीठ प्रशासनानं राम के नाम प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर आमची याला परवानगी नसल्याचं स्पष्ट केलं होतं. विद्यापीठात डॉक्युमेंटरी दाखवणाऱ्यांवर कारवाई करु असंही सांगण्यात आलं होतं. मात्र, विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधाला न जुमानता राम के नाम डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली. जेएनयूएसयूची अध्यक्ष आईषी घोष हिनं आम्ही यूनियनच्या हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित केला आहे. भाजप आरएसएसच्या इशाऱ्यावर डॉक्युमेंटरी दाखवण्यास विद्यापीठ प्रशासनानं विरोध केल्याचं म्हटलं.
चित्रपट निर्माते आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते कलाकार आनंद पटवर्धन यांनी राम के नाम या डॉक्युमेंटरीची निर्मिती केली आहे. या डॉक्युमेंटरीमध्ये 1992 मधील विश्व हिंदू परिषदेकडून राम मंदिर बांधण्यासाठी राबवण्यात आलेल्या अभियानासंदर्भातील चित्रण करण्यात आलं होतं.
Nagpur पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना माहीत आहेत का? ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती
JNUSU holds Peaceful screening of Ram Ke Naam after JNU administration warning of cancellation programme