बंगळुरू: देशातील विविध राज्यांमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे भाजपशासित कर्नाटक राज्यामध्ये मात्र दहावीच्या परीक्षा होतील अशी घोषणा शिक्षणमंत्री सुरेश कुमार यांनी केली होती. दहावीच्या परीक्षा जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात होतील असं त्यांनी सांगितलं होतं. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी जर जुलैमध्ये कोरोना रुग्ण संख्या नियंत्रणात आली नाही तर दहावीच्या परीक्षा रद्द केल्या जाऊ शकतात अशी माहिती दिली. (Karanatka Chief Minister B S Yediyurappa said they take final decision of sslc exam in July)
कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी येडियुरप्पा एका दिवसाच्या बेळगाव आणि धारवाडच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी एसएसएलसी म्हणजेच 10 वी च्या परीक्षांची घोषणा झाल्यामुळे पालकांनी घाबरून जाऊ नये, असे देखील सांगितलं. ते पुढे म्हणाले शिक्षणमंत्र्यांनी यापूर्वीच सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाईल , अशी माहिती दिलेली आहे. येडियुरप्पा पुढे म्हणाले करून परिस्थिती सामान्य झाल्याशिवाय परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेतला जाणार नाही.
बेळगाव मधील आढावा बैठकीत मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी राज्य सरकार कोरोना संसर्ग स्थितीची बेळगाव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या संस्थेअंतर्गत पाहणी करण्यासाठी एक प्रशासक नियुक्त करेल, असं येडियुरप्पा यांनी सांगितलं.
बारावीच्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या गुणांच्या आधारे गुण दिले जातील असे देखील सुरेश कुमार यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की, यंदाच्या वर्षी बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यात येईल. बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाबद्दल समाधान नसेल त्यांच्यासाठी पूर्ण परिस्थिती सामान्य झाल्यानंतर परीक्षा घेण्यात येईल.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलींगच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जाहीर केला आहे. एनआयओएसनं 19 मे रोजी दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. सीबीएसई, आयसीएसई पाठोपाठ एनआयओएस बोर्डानं बारावी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
ICAI CA Foundation Exam 2021: सीए फाऊंडेशनच्या परीक्षा लांबणीवर, आयसीएआयकडून नव्या तारखेची घोषणाhttps://t.co/UdwwCpHrYz#icaiexams | #CancelExamsSaveLives | #ICAI
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 6, 2021
संबंधित बातम्या:
(Karanatka Chief Minister B S Yediyurappa said they take final decision of sslc exam in July)