बंगळुरू: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि हित लक्षात सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल महिन्यात सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या होत्या. तर, दुसरीकडे भाजपशासित राज्य कर्नाटकमध्ये मात्र दहावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. दहावीच्या परीक्षा जुलै महिन्यातील तिसऱ्या आठवड्यामध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा पार्श्वभूमीवर कर्नाटकातील बारावीच्या परीक्षा मात्र रद्द करण्यात आल्या आहेत कर्नाटकचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री सुरेश कुमार यांनी एका कार्यक्रमात ही माहिती दिली. (Karnataka State Education Minister Suresh Kumar said SSLC Exams 2021 would be conducted in the 3rd week of July )
बारावीच्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या गुणांच्या आधारे गुण दिले जातील असे देखील सुरेश कुमार यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की, यंदाच्या वर्षी बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यात येईल. बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाबद्दल समाधान नसेल त्यांच्यासाठी पूर्ण परिस्थिती सामान्य झाल्यानंतर परीक्षा घेण्यात येईल.
कर्नाटक सरकारने सेकंडरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच दहावी या वर्षाची परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरेश कुमार यांनी सांगितले की या दहावीच्या परीक्षा जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होतील. यामध्ये गणित विज्ञान, सामाजिक शास्त्रे यासाठी बहुपर्यायी प्रश्न असतील. दुसरीकडे भाषा विषयासाठी वेगळी प्रश्नपत्रिका तयार करण्यात येईल. बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेमध्ये 40 गुणांची परीक्षा घेतली जाईल, यामध्ये विद्यार्थ्यांना अडचणी येणार नाहीत अशा प्रकारचे प्रश्न असतील.
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याची काळजी घेऊन परीक्षा घेतली जाईल, असे देखील त्यांनी सांगितले.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलींगच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जाहीर केला आहे. एनआयओएसनं 19 मे रोजी दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. सीबीएसई, आयसीएसई पाठोपाठ एनआयओएस बोर्डानं बारावी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
संबंधित बातम्या
(Karnataka State Education Minister Suresh Kumar said SSLC Exams 2021 would be conducted in the 3rd week of July )