स्वारातीम विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान गोंधळ, सर्व्हर डाऊन झाल्यामुळे विद्यार्थांना पुन्हा संधी

| Updated on: Jul 13, 2021 | 11:49 PM

अचानकपणे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला. यामध्ये विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार 40 प्रश्नांची प्रश्नपत्रिका होती साधारण पाच प्रश्न सोडवल्यानंतर सर्व्हर अचानकपणे डाऊन झाले

स्वारातीम विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान गोंधळ, सर्व्हर डाऊन झाल्यामुळे विद्यार्थांना पुन्हा संधी
ऑनलाईन परीक्षा
Follow us on

लातूर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने मंगळवारी (13 जुलै) बीए, बीकॉम आणि बीएस्सीतील विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली. मात्र अचानकपणे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला. यामध्ये विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार 40 प्रश्नांची प्रश्नपत्रिका होती. मात्र, साधारण पाच प्रश्न सोडवल्यानंतर सर्व्हर अचानकपणे डाऊन झाले आणि विद्यापीठाची वेबसाईट बंद पडल्याचा प्रकार घडला. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना नमस्ताप सहन करावा लागला. उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयात हा प्रकार घडला. (Latur Udgir due to server down online exam conducted by Swami Ramananda Tirtha Marathwada University has been stoped)

अचानपकणे सर्व्हर डाऊन झाले

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा तसेच महाविद्यालयात ऑनलाईन पद्धतीने शिकवले जात आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षासुद्धा ऑनालीईन पद्धतीनेच होत आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फेसुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. मंगळवारी विद्यापीठातर्फे बीए, बीकॉम आणि बीएस्सीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. मात्र, यावेळी लातूरमध्ये ऑनालाईन पद्धतीने परीक्षा देत असताना अचानपकणे सर्व्हर डाऊन झाले. परिणामी विद्यार्थांना परीक्षा देण्यास अडथळा निर्माण झाला.

विद्यापीठातर्फे परीक्षा पुन्हा घेण्यात येणार

विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार एकूण 40 प्रश्नांची प्रश्नपत्रिका होती. साधारण पाच प्रश्न सोडवल्यानंतर सर्व्हर अचानकपणे डाऊन झाले. त्यानंतर मात्र, विद्यापीठाची वेबसाईट बंद पडली. या प्रकारामुळे पदवीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यानंतर कॉलेज प्रशासनाने विद्यापीठाशी संपर्क साधल्यानंतर आजची परीक्षा पुन्हा घेण्यात येईल असं कळवन्यात आलं आहे .

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी प्रवेशप्रक्रिया सुरू

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. पीएचडी प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून विद्यार्थ्यांना येत्या 31 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत. तर, पीएचडीची ऑनलाईन परीक्षा 22 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. विद्यापीठानं वेबसाईटवर यासंदर्भात अधिकृत नोटिफिकेशन जारी केली आहे.

पीएचडी ऑनलाईन परीक्षा 22 ऑगस्टला

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी प्रवेश परीक्षेसाठी 12 जुलैपासून नोंदणी सुरु होणार आहे. तर पात्र विद्यार्थी 31 ऑगस्टपर्यंत विद्यापीठाच्या वेबसाईटवर अर्ज दाखल करु शकतात. पीएचडीची प्रवेश परीक्षा सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी लॉग-इन केल्यानंतर विद्यार्थी २ तास परीक्षा देऊ शकतील. विद्यापीठातर्फे पीएचडी प्रवेश परीक्षा 22 ऑगस्ट रोजी घेतली जाणार असून या परीक्षेचा निकाल 24 ऑगस्ट रोजी जाहीर केला जाणार.

इतर बातम्या :

RTE च्या प्रवेशांना आणखी एकदा मुदतवाढ, 23 जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करण्याचं आवाहन

सोलापूरच्या सीईओंची भन्नाट आयडिया, शिक्षकांच्या साथीनं 600 हून अधिक गावात कट्ट्यावर ,पारावर ,झाडाखाली शाळा सुरु

शालेय फीच्या मुद्यासाठी पालक संघटना सुप्रीम कोर्टात, राज्य सरकार ठोस निर्णय घेत नसल्याची भावना

(Latur Udgir due to server down online exam conducted by Swami Ramananda Tirtha Marathwada University has been stoped)