यूपीएससीची सिव्हिल सर्व्हिस 2021 परीक्षेचा निकाल (UPSC 2021 Final Results) 30 मे रोजी जाहीर करण्यात आला आणि इतर परीक्षांप्रमाणेच (Exams) या परीक्षेत सुद्धा मुलींनी बाजी मारली! श्रुती शर्माने ऑल इंडिया पहिला क्रमांक पटकावला (Shruti Sharma AIR 1) आहे. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरही मुलींनी स्थान पटकावलं आहे. अंकिता अग्रवाल दुसऱ्या, गामिनी सिंगला तिसऱ्या आणि ऐश्वर्या वर्मा चौथ्या स्थानावर आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने 31 मे 2022 रोजी आयएएस टॉपर्सचे गुण जाहीर केले. ज्या उमेदवारांनी निकालाच्या यादीत स्थान मिळवले आहे ते सर्व उमेदवार आता त्यांचे गुण तपासू शकतात. UPSC 2021 च्या अंतिम निकालात पहिल्या 3 उमेदवारांचे गुण बघुयात.