इयत्ता बारावीचा आज निकाल; ‘टीव्ही9 मराठी’वर असा पाहा

| Updated on: May 21, 2024 | 1:06 PM

Maharashtra Board HSC Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी हे या परीक्षेच्या निकालाच्या प्रतिक्षेत होते. शेवटी आता निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट आले असून उद्या बारावीचा निकाल लागणार आहे.

इयत्ता बारावीचा आज निकाल; टीव्ही9 मराठीवर असा पाहा
Students
Follow us on

गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी हे बारावीच्या निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. राज्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 दरम्यान या परीक्षा पार पडल्या. विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून परीक्षेच्या निकाल्याच्या प्रतिक्षेत होते. शेवटी आता विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपलीये. आज 21 मे 2024 रोजी बारावीचा निकाल लागणार आहे. विशेष म्हणजे तुम्ही इयत्ता बारावीचा निकाल https://www.tv9marathi.com/ या संकेतस्थळाला भेट देऊन पाहू शकता. अत्यंत सोपी अशी प्रक्रिया निकाल पाहण्याची आहे.

विद्यार्थ्यांनी खालील चाैकोनात परीक्षा क्रमांक आणि आईचे नाव टाकून निकाल पाहावा

21 मे 2024 रोजी बरोबर 1 वाजता तुम्ही https://www.tv9marathi.com/ या संकेतस्थळाला भेट द्या आणि तुमचा बारावीचा निकाल तुमच्यासमोरील स्क्रीनवर पाहा. निकाल पाहण्यासाठी आपल्याकडे परीक्षा क्रमांक असणे आवश्यक आहे. यासोबतच आईचे नाव टाकावे लागेल. सबमिटवर क्लिक केले की, तुमचा निकाल तुम्हाला अगदी सहज पद्धतीने पाहता येईल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून गेल्या आठवड्यातच जाहीर करण्यात आले होते की, यंदा बारावीचा निकाल मेच्या तिसऱ्या आठवड्यात आणि दहावीचा निकाल हा मेच्या चाैथ्या आठवड्यात लागेल. बारावीच्या निकालाचे काम बोर्डाकडून पूर्ण करण्यात आलंय. आता आज सकाळी 11 वाजता बोर्डाची एक पत्रकार परिषद पार पडेल.

या पत्रकार परिषदेमध्ये विभागाची टक्केवारी जाहीर केली जाईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना एक वाजता आपले निकाल मिळतील. उद्या फक्त ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना निकाल बघता येतील. प्रत्यक्षात मार्कशीट मिळवण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी लागेल. उद्या याबाबतची घोषणा बोर्डाकडून केली जाईल. आता या निकालात कोण बाजी मारणार हे पाहण्यासारखे ठरेल.

14 लाख विद्यार्थ्यांनी यंदा बारावीची परीक्षा दिलीये. विशेष म्हणजे राज्यात कॉपीमुक्त परीक्षा पार पडलीये. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून परीक्षेसाठी जय्यत तयारी देखील करण्यात आली होती. दरवेळीप्रमाणे यंदाही मुलीच या निकालात बाजी मारतील असे सांगितले जातंय. उद्या बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी हे याबाबत माहिती देतील.