महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. विशेष म्हणजे निकालाच्या टक्क्यात मोठी वाढ झालीये. यंदाही दरवेळीप्रमाणेच मुलींनी निकालात बाजी मारलीये. मुलांपेक्षा मुली या वरचढ ठरल्या आहेत. कोकण विभाग निकालात अव्वल ठरलाय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून काही दिवसांपूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते की, बारावीचा निकाल मेच्या तिसऱ्या आठवड्यात आणि दहावीचा निकाल हा मेच्या चाैथ्या आठवड्यात जाहीर केला जाईल. आज म्हणजेच 27 मे 2024 रोजी दहावीचा निकाल लागणार आहे.
विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल हा ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. आज दुपारी एक वाजता विद्यार्थी आपला निकाल पाहू शकणार आहेत. राज्यात दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 यादरम्यान पार पडली. विशेष म्हणजे या परीक्षेची तयारी बोर्डाकडून जय्यत प्रकारे करण्यात आली. विद्यार्थी अगदी सोप्पा पद्धतीने दहावीचा निकाल पाहू शकतात.
यंदा 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिलीये. आता विद्यार्थ्यांनी निकालाची प्रतिक्षा संपली आहे. mahahsscboard.in, mahresult.nic.in, msbshse.co.in या साईटवर जाऊन विद्यार्थी दहावीचा निकाल पाहू शकतात. अगोदर ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केला जाईल, त्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळेल.
Maharashtra SSC RESULT
बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारलीये. आता दहावीच्या निकालात कोण बाजी मारते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. विशेष म्हणजे दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची यंदा संख्या अधिक होती. संपूर्ण राज्यभरात कॉपीमुक्त परीक्षा पार पडलीये. बोर्डाकडून अकरा वाजता विभागीय टक्केवारी जाहीर केली जाईल.
कोणता विभाग टक्केवारीमध्ये अव्वल राहतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. सकाळी अकरा वाजता मंडळाचे अध्यक्ष राज्यात 100 पैकी 100 टक्के किती विद्यार्थ्यांना मिळाले, निकाल मुलींनी बाजी मारली की, मुलांनी याबद्दल सर्व माहिती देतील. दहावीच्या निकालाची प्रतिक्षा विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून करत होते.