महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाची माहिती देण्यात आली. गेल्या कित्येक दिवसांपासून विद्यार्थी हे या निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसले. शेवटी मंडळाकडून नेमक्या कोणत्या आठवड्यात निकाल जाहीर केला जाईल हे सांगण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच मोठा दिसला मिळाला. राज्यात यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 यादरम्यान पार पडली. विशेष म्हणजे कॉपीमुक्त परीक्षा पार पडल्या आहेत. आता बारावीच्या परीक्षेच्या निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट आले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी मोठी माहिती निकालाबद्दल दिली. यंदा बारावीचा निकाल मेच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार असे त्यांनी म्हटले आणि निकाल आज लागतोय. बारावीचा निकाल 21 मे 2024 रोजी आज दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार आहे.
Maharashtra HSC RESULT
जवळपास सर्वच बोर्डांचे बारावीचे निकाल हे जाहीर करण्यात आले होते. फक्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर होणे बाकी होते. आता बोर्डाचा बारावीचा निकाल देखील आज जाहीर केला जातोय. आता निकालाबद्दलची उत्सुकता विद्यार्थ्यांमधील अधिक वाढल्याचे बघायला मिळत आहे.
mahresult.nic.in, mahahsscboard.in, hsc.mahresults.org.in, hscresult.mkcl.org, results.gov.in. या साईटवर जाऊन विद्यार्थी हे बारावीचा निकाल आरामात पाहू शकतात. बारावीचा निकाल 9 विभागांमध्ये लागणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण अशा एकूण नऊ विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.
यंदा राज्यातून बारावीची परीक्षा तब्बल 14 लाख विद्यार्थ्यांनी दिली. आता या निकालात कोण बाजी मारणार हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. कोणता विभाग निकालात अव्वल ठरतो हे आज कळेल. आता लवकरच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या निकालाची तारीख देखील जाहीर केली जाऊ शकते.