मुंबई : उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च-एप्रिल 2023 मध्ये बारावीच्या परीक्षा झाल्या. आज HSC परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवरच या निकालासंदर्भात माहिती मिळू शकते. थोड्याच वेळात विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान झाल्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने 12 वी चा निकाल महत्वाचा असतो. त्यामुळे विद्यार्थी, पालकांचे इयत्ता बारावीच्या निकालाकडे लक्ष लागलेले असते.
बारावीचा निकाल जाहीर, एकूण निकाल हा 91.25 टक्के
मुंबई विभागातून रायगड जिल्ह्याची बाजी
रायगड जिल्ह्याचा 90.53 टक्के निकाल
रायगडमध्येही मुलींचीच बाजी,
मुलींची पास होण्याची टक्केवारी 93.59,
तर 87.71 टक्के मुलं उत्तीर्ण
आर्ट विभागात ८० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण
वडील ऑटोचालक, आई धुणी-भांडी करते
स्वतः लहान मुलांना शिकवून बारावीत चांगले गुण
स्वतःचा खर्च भागवून बारावीत घवघवित यश
कॉमर्स विभागात वेदांत काकानी याने 97.66 टक्के गुण मिळवले
विज्ञान शाखेत अनुरीम पौणिकर हिने 95.05 टक्के गुण पटकावले
आर्ट शाखेत अनुष्का चवरे हिने 90.17 टक्के गुण मिळवले
हे विद्यार्थी आंबेडकर कॉलेजमधील आहेत
कॉलेजतर्फे या विद्यार्थ्यांचा सत्कार करऱ्यात आला
हा पल्ला गाठताना पालक, कुटुंबियांचे पाठबळ महत्वाचे असते
प्रत्येक विद्यार्थ्याच्या हे मेहनतीचे फळ आहे
नापास विद्यार्थ्यांनी पुन्हा प्रयत्न करावा- शिंदे
अजित पवार यांनी केले अभिनंदन
शिक्षक आणि पालकांच्या योगदानाचे केले कौतुक
अपयशी विद्यार्थ्यांनी खचून न जाता प्रयत्न करण्याचा दिला सल्ला
राज्यातील इयत्ता १२ वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन! या यशात मोलाचं योगदान असणाऱ्या शिक्षक आणि पालकांचं देखील मनापासून अभिनंदन करतो. विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा!
अपयशी झालेल्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी निराश तसंच… pic.twitter.com/vcbScr1FAH
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 25, 2023
लातूर विभागाचा 90.37 टक्के निकाल लागला आहे.
लातूर, नांदेड आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांचा समावेश…
लातूर विभागात उत्तीर्ण होणाऱ्या मुलींची संख्या 94.16 इतकी आहे, मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 87.32 इतके आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर
बीएमसीसीच्या विद्यार्थ्यांनी बारावीत मिळवलं घवघवीत यश
अभ्यासाचं टेन्शन घेतलं नाही, त्यामुळे चांगला रिझल्ट पाहायला मिळाला
जवळपास 90 टक्क्यांच्यावरती विद्यार्थ्यांना मिळाले मार्क्स आहेत
पुण्यातील दिव्यांग विद्यार्थी सौरव हेगडेनं बारावी परीक्षेत मिळवलं घवघवीत यश
सौरवला मिळाले 88 टक्के मार्क्स
सौरवच्या यशानं आई वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे
मी ऑडीओ ऐकून अभ्यास करत होतो असं सौरव हेगडे यांनी सांगितलं आहे.
परीक्षेची भीती वाटली नाही, चांगला अभ्यास केला आणि त्याचं फळ मला मिळालं आहे असंही सौरवने सांगितले.
औरंगाबाद विभागातही बारावीच्या निकालात मुलांपेक्षा मुलीच सरस ठरल्या आहेत. बारावीच्या निकालात तब्बल 94.5% मुली पास झाल्या आहेत. तर ९०.३२ टक्के मुले पास झाले आहेत. यावर्षी बारावीच्या परीक्षेला औरंगाबाद विभागातून तब्बल एक लाख 64 हजार 545 विद्यार्थी बसले होते. यापैकी एक लाख 51 हजार 148 विद्यार्थी पास झाले आहेत. यात तर 63 हजार 631 इतके मुले बारावी परीक्षेत पास झाले आहेत. त्यामुळे औरंगाबाद विभागात बारावीच्या परीक्षेत मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली आहे.
परभणीः जिल्ह्याचा बारावी परीक्षेचा निकाल 86.94 टक्के,
बारावी परीक्षेसाठी परभणी जिल्ह्यातून 23 हजार 956 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते,
जिल्ह्यात एकूण 20 हजार 828 विद्यार्थी उत्तीर्ण झाले,
औरंगाबाद विभागामध्ये परभणी जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे.
पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयात विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी जमले
थोड्या वेळात विद्यार्थी करणार जल्लोष
ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे महाराष्ट्र इयत्ता 12 वीचे गुण 2023 मध्ये सुधारायचे आहेत. त्यांच्यासाठी महाराष्ट्र HSC पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये घेतल्या जातील.
हस्ताक्षरात बदल असलेल्या 396 विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर
396 विद्यार्थ्यांचा हस्ताक्षर बदल प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय
फरदापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होणार
हस्ताक्षर बदल प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता
मात्र मूळ उत्तरपत्रिकेवरून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर
कोकण विभागाचा निकाल ९६.०१ टक्के
१२ वीच्या निकालात मुलींची बाजी
जे विद्यार्थी मुख्य बोर्डाच्या परीक्षेत त्यांचे महाराष्ट्रातील सर्व एचएससी पेपर सोडू शकणार नाहीत.
त्यांना जुलै-ऑगस्टमध्ये आणखी एक संधी मिळेल.
तारखानंतर जाहीर केल्या जातील.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुण सुधारण्यासाठी वर्ग सुधारणा योजना परीक्षा देखील घेतल्या जाणार आहेत.
महाराष्ट्र इयत्ता 12वी निकाल 2023 डाउनलोड करण्यासाठी आता थेट लिंक आहे, विद्यार्थी त्यांचे निकाल डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करू शकतात.
https://mahresult.nic.in/mbhsc2023/mbhsc2023.htm
बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर
ऑनलाईन निकाल या वेबसाईटवरती पाहा
result live athttps://mahresult.nic.in/
थोड्या वेळात विद्यार्थी करणार जल्लोष
कोकण 96.01 टक्के
पुणे 93.34 टक्के
कोल्हापूर 93.28 टक्के
औरंगाबाद 91.85 टक्के
नागपूर 90.35 टक्के
अमरावती 92.75 टक्के
नाशिक 91.66 टक्के
लातूर 90.37 टक्के
मुंबई 88.13 टक्के
यंदाचा निकाल 91.25 टक्के इतका लागला आहे
यंदाही मुलींनीचं बारावीच्या परिक्षेत बाजी मारली
कोकण विभाग आघाडीवर आहे
गेल्यावर्षीच्या तुलनेत बारावीचा निकाल 2.97 टक्क्यांनी घटला
बारावीच्या निकालात राज्यात यंदा कोकण विभागाची बाजी
कोकण विभागाचा निकाल 96.01 टक्के इतका लागला आहे
सर्वाधिक कमी निकाल हा मुंबई विभागाचा लागला आहे 88.13 टक्के
राज्यात यंदाही मुलींची बाजी
मुलींचा निकाल 93.73 टक्के
तर मुलांचा निकाल 81 टकके इतका लागला आहे
17 एकुण कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल हा 0 टक्के लागला
20 ते 30 टक्के 3 महाविद्यालय आहेत
30 ते 40 – 3
100 टक्के 2369 महाविद्यालय निकाल लागला आहे
पेपर काळात 11 गुन्हे दाखल झाले आहेत
पेपर गैरप्रकारामध्ये दाखल झाले आहेत
डमी विद्यार्थी पुणे विभागात पकडला
345 विद्यार्थी कॉपी करताना पकडले
उत्तरपत्रिकेत रिकाम्या जागेत काही लिखाण केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला
संभाजीनगरमध्ये झालेल्या गैरप्रकारत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे
भौतिकशास्त्र या विषयात ओव्हररायटींग झालं होतं
परिक्षेच्या काळात राज्यात 271 भरारी पथकं तैनात होती
त्यामुळे यंदा गैरप्रकाराला आळा बसल्याचं दिसलं आहे
या परीक्षेत 9 विभागीय मंडळात 14 लाख 28 हजार194 विद्यार्थ्यांनी नोंदणी
14 लाख 16 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली
12 लाख92 हजार 468 हजार एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले
91.25 टक्के इतका निकाल आहे
मुलींचा निकाल 93.73 टक्के
बारावीच्या निकालात यंदाही कोकण विभाग अव्वल
सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा
बारावीच्या निकालात यंदाही मुलींची बाजी
12 बोर्डाचा निकाल आज लागणार
12 वीच्या निकालाबद्दल बोर्डाची पत्रकार परिषद
दुपारी दोन वाजता पाहता येणार निकाल
बारावीनंतर परकीय भाषा शिकण्यासाठी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. देशातील विविध विद्यापीठात फ्रेंच, जपानी, पर्शियन, जर्मन, कोरियन स्टडिज, रशियन स्टडिज, स्पॅनिश, पोर्तुगीज, इटालियन, लॅटिन अमेरिका भाषांचा अभ्यासक्रम जवाहरलाल नेहरु विद्यापीठात घेतले जातात.
बारावीनंतर विज्ञान शाखेतील विद्यार्थी औषधनिर्माणशास्त्र म्हणजेच फार्मसीच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतात. बी. फार्मसी अभ्यासक्रम पूर्ण करुन औषधनिर्माण कंपन्यांमध्ये जाता येते. तसेच स्वत:चे मेडिकल स्टोअर सुरु करता येते.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि.२५) दुपारी दोन वाजल्यापासून ऑनलाइन जाहीर होईल.मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. निकालासाठी आता काही तास उरले आहेत.
12 वी HSC बोर्डाचा आज दुपारी 2 वाजता निकाल जाहीर होईल. त्याआधी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद होईल.
Maharesult.nic.in
hsc.maharesult.org.in
hscresult.mkcl.org
राज्यातील 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी 2 वाजता ऑनलाइन निकाल जाहीर होणार आहे.
दुपारी 2 वाजता ऑनलाईन पद्धतीने लागणार निकाल
दौंड तालुक्यातील पडवीच्या सोहम मांढरेचं यूपीएससी परीक्षेत यश
देशात मिळवलं 218 वं स्थान
मागेही यूपीएससी परीक्षा पास होऊन त्यांनी 267 वी रँक मिळवला होती
त्याही पुढे जाऊन त्याने दुसऱ्यांदा यूपीएससी परीक्षेत गगन भरारी घेत यश संपादन केलंय
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवलं आहे
सोहमने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचं सर्व स्तरातून कौतुक होतंय
महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या अधिकृत संकेतस्थळावर (mahresult.nic.in) जावून HSC result 2023 या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा सीट नंबर आणि जन्म तारीख टाकून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या.
महाराष्ट्र स्टेट बोर्डकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, निकाल घोषीत करण्याची संपूर्ण तयारी झाली आहे. लवकरच निकाल घोषित करण्यात येईल. निकाल लागल्यानंतर काही दिवसातच विद्यार्थ्यांना त्यांचे ओरिजीनल मार्कशीट कॉलेजमध्ये मिळतील.
SMS द्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्स मध्ये जावून आपला सिट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.
सायन्स, कॉमर्स, आर्ट तिन्ही विभागांचा निकाल महाराष्ट्र स्टेट बोर्टच्या अधिकृत वेबसाईट वर mahresult.nic.in पाहता येईल. यासोबतच विद्यार्थ्यांना SMS द्वारेही निकाल पहाता येणार आहे.
महाराष्ट्र स्टेट बोर्ड 25 मे पर्यंत निकालाची तारीख जाहीर करणार आहे.
महाराष्ट्रातून SSC च्या परीक्षेसाठी जवळपास 15 लाख आणि HSC परीक्षांसाठी 14 लाख विद्यार्थी बसले आहेत.