प्रदीप कापसे, पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. आता या परीक्षेचा निकाल कधी लागणार यासंदर्भात उत्सुकता विद्यार्थ्यांना लागली आहे. कारण नुकतेच सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचे दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाले. आता महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाची प्रतिक्षा होती. ही प्रतिक्षा संपली आहे. २५ मे रोजी दुपारी २ वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल लागणार आहे. तसेच आता दहावीचा निकाल कधी लागणार याची प्रतिक्षा विद्यार्थ्यांना आहे.
दहावीचा निकाल कधी
बारावीच्या विद्यार्थ्यांची निकालची प्रतिक्षा संपली आहे. बारावीचा निकाल २५ मे रोजी दुपारी २ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. बोर्डाकडून निकालाची तयारी पूर्ण झाली आहे. बारावीच्या नंतर दहावीचा निकाल लागणार आहे. दहावीचा निकाल जून महिन्याचा पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.
किती विद्यार्थी होते
दहावीच्या परीक्षेला राज्यातून 15,77,256 विद्यार्थी बसले होते. त्यात 8,44,116 मुले तर 7,33,067 मुलींचा समावेश होता. राज्यभरातील 5,033 सेंटरवर दहावीची परीक्षा झाली होती. आता या सर्व विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा आहे.
कुठे पाहाता येईल निकाल?
बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहाता येणार आहे.
निकालानंतर प्रवेश प्रक्रिया
CBSE इयत्ता 10 च्या परीक्षेला 21,86,940 विद्यार्थी बसले होते आणि 16,96,770 विद्यार्थी 12वीच्या परीक्षेला बसले होते. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल मिळाले आहे. आता महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीचा निकाल २५ मे रोजी लागणार आहे. त्यानंतर जून महिन्यात विद्यार्थ्यांची प्रवेशाची प्रक्रिया सुरु होणार आहे.
सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरु झाली होती. या परीक्षेसाठी 15.21 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षेला सुमारे 10 लाख विद्यार्थी बसले होते. 2022 मध्ये सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात आली होती. टर्म 1 ची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तर टर्म 2 ची परीक्षा मे-जूनमध्ये घेण्यात आली होती. बोर्डाने दोन्ही टर्मचे गुण एकत्र करून निकाल जाहीर केला होता.