Maharashtra HSC SSC exam schedule 2022 : दहावी बारावीच्या परीक्षांचं सविस्तर विषयनिहाय वेळापत्रक जाहीर, वाचा एका क्लिकवर

| Updated on: Dec 21, 2021 | 7:06 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून (MSBHSE) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं (Maharashtra HSC SSC exam 2022 time table ) सविस्तर वेळापत्रक आज जाहीर करण्यात आलंय.

Maharashtra HSC SSC exam schedule 2022 : दहावी बारावीच्या परीक्षांचं सविस्तर विषयनिहाय वेळापत्रक जाहीर, वाचा एका क्लिकवर
Maharashtra HSC SSC exam schedule 2022
Follow us on

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून (MSBHSE) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं (Maharashtra HSC SSC exam 2022 time table ) सविस्तर वेळापत्रक आज जाहीर करण्यात आलंय. बारावीच्या परीक्षा (HSC) 4 मार्च ते 7 एप्रिलदरम्यान पार पडणार आहेत. तर त्यानंतर दहावीच्या (SSC) परीक्षांना सुरूवात होणार आहे. दहावीच्या परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिलदरम्यान पार पडणार आहेत. 14 फ्रेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत बारावीच्या तोंडी परीक्षा होणार आहेत. 25 फेब्रुवारी ते 14 मार्च दहावीच्या तोंडी परीक्षा होणार आहेत.

Maharashtra HSC SSC exam schedule 2022 : दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, कोणत्या तारखेला परीक्षा? वाचा सविस्तर

दहावीच्या परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक

वार व दिनांक वेळप्रथम सत्रवेळ द्वितीय सत्र
15 मार्च 2022, मंगळवार 10.30 ते 2.00 प्रथम भाषा मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तामिळ, तेलुगु, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी 3.00 ते 6.00 द्वितीय भाषा जर्मन फ्रेंच द्वितीय सत्र
16 मार्च 2022 बुधवार10.30 ते 2.00द्वितीय भाषा भाषा मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तामिळ, तेलुगु, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी
10.30 ते 12.45 द्वितीय किंवा तृतीय भाषा
मराठी संयुक्त
17 मार्च 2022 , गुरुवार10.30 ते 2.00मल्टी स्किल असिस्टंट टेक्निशियन मुलभूत तंत्रज्ञानाची ओळख,ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्निशियन, स्टोअर ऑपरेशन असिस्टंट, असिस्टंट ब्युटी थेरपिस्ट, टुरिझम अँड हॉस्पिटलिटी फुड अँड बेवरेज सर्व्हिस ट्रेनी, अ‌ॅग्रिकल्चर सोलनेशियस क्रॉप कल्टिवेटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड हार्डवेअर फील्ड टेक्निशिअन जर होम अप्लायनसेस, होमक केअर, होम हेल्थ एड, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, पॉवर कंझ्युमर एनर्जी मीटर टेक्निशिअन, अॅपरेल्स सुईंग मशीन ऑपरेटर, प्लंबर जरनरल
19 मार्च 2022 शनिवार 10.30 ते 2.00 प्रथम भाषा इंग्रजी (03), तृतीय भाषा इंग्रजी (17)
21 मार्च 2022 सोमवार10.30 ते 2.00द्वितीय आणि तृतीय भाषा हिंदी
10.30 ते 12.45 द्वितीय भाषा संयुक्त अभ्यासक्रम
22 मार्च 2022 मंगळवार10.30 ते 2.00द्वितीय भाषा किंवा तृतीय भाषा
उर्दू, गुजराती, संस्कृत, पाली, अर्धमागधी, पर्शियन, अरेबिक, अवेस्ता, पहलबी, रशियन
3.00 ते 5.15 द्वितीय भाषा संयुक्त अभ्यासक्रम

उर्दू (संयुक्त), गुजराती (संयुक्त), संस्कृत(संयुक्त), पाली(संयुक्त), अर्धमागधी(संयुक्त), पर्शियन(संयुक्त), अरेबिक(संयुक्त), अवेस्ता(संयुक्त), पहलबी(संयुक्त), रशियन(संयुक्त), गुजराती (संयुक्त), कन्नड (संयुक्त), तामिळ (संयुक्त), तेलुगु (संयुक्त), मल्याळम (संयुक्त), सिंधी (संयुक्त), बंगाली (संयुक्त), पंजाबी (संयुक्त)
24 मार्च 2022 गुरुवार10.30 ते 2.00गणित भाग 1 बीजगणित
10.30 ते 12.45 अंकगणित (पात्र दिव्यांग परिक्षार्थींसाठी )
26 मार्च 2022 शनिवार10.30 ते 12.45 गणित भाग 2 भूमिती
28 मार्च 2022 सोमवार10.30 ते 12.45 विज्ञान तंत्रज्ञान भाग १
10.30 ते 12.45 शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र. गृहशास्त्र (पात्र दिव्यांग परीक्षार्थींसाठी, नियमित व पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी )
30 मार्च 2022 बुधवार 10.30 ते 12.45 विज्ञान तंत्रज्ञान भाग 2
1 एप्रिल 2022 शुक्रवार10.30 ते 12.45 सामाजिक शास्त्रे पेपर 1 इतिहास व राज्यशास्त्र
4 एप्रिल 2022 सोमवार 10.30 ते 12.45 सामाजिक शास्त्रे पेपर भाग 2 भूगोल

बारावीच्या परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक

वार आणि दिनांक वेळ प्रथम सत्रवेळ द्वितीय सत्र
4 मार्च 2022 शुक्रवार 10.30 ते 2.00इंग्रजी
5 मार्च 2022 शनिवार 10.30 ते 2.00हिंदी 03.00 ते 6.30जर्मन, जपानी, चिनी, पर्शियन
07 मार्च 2022 सोमवार 10.30 ते 2.00मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी,(अरेबिक, देवनागरी), मल्याळम, तामिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली, 03.00 ते 6.30उर्दू, फ्रेंच, अर्धमागधी, स्पॅनिश, पाली
8 मार्च 2022 मंगळवार10.30 ते 2.00महाराष्ट्री प्राकृत, संस्कृत 03.00 ते 6.30रशियन, अरेबिक
09 मार्च 2022 बुधवार 10.30 ते 2.00वाणिज्य संघटन व व्यवस्थापन
10 मार्च 2022 गुरुवार 10.30 ते 2.00तर्कशास्त्र, भौतिकशास्त्र
11 मार्च 2022 शुक्रवार 10.30 ते 2.00चिटणासाची कार्यपद्धती, गृहव्यवस्थापन
12 मार्च 2022 शनिवार10.30 ते 2.00रसायनशास्त्र03.00 ते 6.30राज्यशास्त्र (कला व वाणिज्य)
14 मार्च 2022 सोमवार 10.30 ते 2.00गणित आणि संख्याशास्त्र (कला व विज्ञान), गणित संख्याशास्त्र (वाणिज्य)03.00 ते 5.45तालवाद्य नियमित व पुनर्परीक्षार्थी
15 मार्च 2022 मंगळवार10.30 ते 2.00बालविकास, कृषि विज्ञान, पशुविज्ञान आणि तंत्रज्ञान
16 मार्च 2022 बुधवार10.30 ते 2.00सहकार (कला, वाणिज्य)
17 मार्च 2022 गुरुवार10.30 ते 2.00जीवशास्त्र, भारतीय संगीताचा इतिहास व विकास, (नियमित व पुनर्परिक्षार्थी )
19 मार्च 2022 शनिवार10.30 ते 2.00भूशास्त्र03.00 ते 6.30अर्थशास्त्र
21 मार्च 2022 सोमवार 10.30 ते 2.00वस्त्रशास्त्र03.00 ते 6.30पुस्तपालन आणि लेखाकर्म
22 मार्च 2022 मंगळवार 10.30 ते 2.00अन्नविज्ञान व तंत्रज्ञान 03.00 ते 6.30तत्वज्ञान , कलेचा इतिहास व रसग्रहण, चित्र, शिल्प व वास्तुशास्त्र, नियमित व पुनर्परीक्षार्थी
23 मार्च 2022 बुधवार 10.30 ते 1.15व्यावसायिक द्विलक्षी अभ्यासक्रम पेपर 1, तंत्रगट १, विद्युत परिरक्षण, यांत्रिक परिरक्षण, स्कुटर व मोटर सायकल संधारण, 03.00 ते 6.30शिक्षणशास्त्र ,
23 मार्च 2022 बुधवार 10.30 ते 1.45सर्वसाधारण स्थापत्य अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स संगणक शास्त्र03.00 ते 6.30मल्टी टास्किंग टेक्निशियन (इलेक्ट्रिकल), इलेक्ट्रॉनिक्स अँड हार्डवेअर इन्स्टॉलेशन टेक्निशियन अँड पेरिफेरन्स (पुनर्परीक्षार्थी), मल्टी टास्किंग टेक्निशियन (फुड प्रोसेसिंग), इलेक्ट्रॉनिक्स (फिल्ड टेक्निशियन वायरम कंट्रोल पॅनेल), पॉवर डिस्ट्रीब्युशन लाईनमन
23 मार्च 2022 बुधवार 10.30 ते 2.00वाणिज्य गट पेपर क्रमांक 1
बँक व्यवस्थापन , कार्यालय व्यवस्थापन, विपणन आणि विक्रय कला, लघुउद्योग आणि स्वंयरोजगार
23 मार्च 2022 बुधवार 10.30 ते 12.45कृषी गट पेपर 1 पशू संवर्धन आणि दुग्धव्यवसाय, पीक शास्त्र, फलोत्पादन,
23 मार्च 2022 बुधवार 10.30 ते 1.45मत्स्य व्यवसाय गट पेपर 1,मत्स्य संस्करण तंत्रज्ञान , गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन03.00 ते 5.15अॅपेरल्स स्पेशलाईज्ड सुइंग मशीन ऑपरेटर, प्लंबर-जनरल-२ ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्निशिअन, रिटेल सेल्स असोसिएट हेल्थकेअर जनरल ड्यूटी असिस्टंट, ब्युटी थेरपिस्ट, अॅग्रिकल्चर मायक्रोइरीगेशन, टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी कस्टमर सर्व्हिस, एक्झिक्युटीव्ह (मिट अँड ग्रीट)
24 मार्च 2022 बुधवार 3.00 ते 6.30मानसशास्त्र
25 मार्च 2022 शुक्रवार 10.30 ते 1.15व्यावसायिक द्विलक्षी अभ्यासक्रम पेपर 2, विद्युत परिरक्षण, यांत्रिक परिरक्षण, स्कुटर व मोटर सायकल संधारण
25 मार्च 2022 शुक्रवार 10.30 ते 1.45सर्वसाधारण स्थापत्य अभिायांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स, संगणकशास्त्र
25 मार्च 2022 शुक्रवार 10.30 ते 2.00वाणिज्य पेपर गट पेपर 2 बँक व्यवसाय, कार्यालय व्यवस्थापन, विपणन आणि विक्रय कला, लघुउद्योग आणि स्वंयरोजगार
25 मार्च 2022 शुक्रवार 10.30 ते 12.45कृषी गट पेपर 2 पशु संवर्धन आणि दुग्धव्यवसाय, पीक शास्त्र, फलोत्पादन
25 मार्च 2022 शुक्रवार 10.30 ते 12.45मत्स्य व्यवसाय पेपर गट 2 मत्स्य संस्करण तंत्रज्ञान, गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन
26 मार्च 2022 शनिवार 3.00 ते 6.30भूगोल
28 मार्च 2022 सोमवार 3.00 ते 6.30इतिहास
29 मार्च 2022 मंगळवार 3.00 ते 6.30संसरक्षणशास्त्र
30 मार्च 2022 बुधवार 3.00 ते 6.30समाजशास्त्र
माहिती तंत्रज्ञान या विषयाची ऑनलाईन परीक्षा 31 मार्च, 1 एप्रिल, 4 एप्रिल रोजी दोन सत्रात घेण्यात येईल. तर सामान्यज्ञान या विषयाची ऑनलाईन परीक्षा 1, 4,5, एप्रिल या दिवशी दोन सत्रात घेण्यात येईल.

बारावी एमसीव्हीसी परीक्षा

बारावीच्या एमसीव्हीसी परीक्षा वेळापत्रकाचं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळानं त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. वेळापत्रक पाहण्यासाठी इथं क्लिक करा.

दहावी परीक्षा अर्ज करण्यास मुदतवाढ

दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विलंब शुल्कासह 1 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. यापूर्वी नियमित शुल्कासह 20 डिसेंबरपर्यंत, तर विलंब शुल्कासह 28 डिसेंबरपर्यंत मुदत होती. आता विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह 26 डिसेंबरपर्यंत तर विलंब शुल्कासह 27 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

दहावी बारावी परीक्षा ऑफलाईनच

ओमिक्रॉनसंदर्भात राज्य शासन खबरदारी घेत आहे. त्याबाबत राज्य सरकारने काही नियमही लागू केले आहेत. या नियमांचे पालन करून दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन पार पडणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन वर्षा गायकवाड यांनी केले होतं.

इतर बातम्या:

MHT CET: सीईटी कक्षाकडून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या नोंदणीला मुदतवाढ, नेमकं कारण काय?

Maharashtra School Reopen: कोरोना रुग्ण घटले, दिवाळी संपली, पहिली ते चौथीचे वर्ग सुरु होण्याची शक्यता

Maharashtra Board SSC HSC Exam 2022 Schedule declared by MSBSHE click here for all details