Maharashtra SSC Result 2021 Declared रत्नागिरी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं पत्रकार परीषद घेत दहावीचा निकाल आज जाहीर केला. दुपारी एक वाजता मुलांना निकाल कळणार होता. मात्र,बोर्डाने दिलेल्या साईट ओपन होत असल्याने निकाल मिळण्यास उशीर झाला आहे. तब्बल एक तास उलटूनही अद्याप निकाल मिळालेला नाही त्यामुळे निकाल पाहण्यासाठी ज्या विद्यार्थी आणि पालकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती ते थोड्या प्रमाणात नाराज झाले आहेत.
दहावीच्या निकालाच्या दोन्ही साईट तासाभरापासून बंद असल्यानं अनेक मुलांची निराशा झाली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून निकालासाठी दोन साईट देण्यात आल्या होत्या. मात्र या साईट क्रॅक झाल्यामुळे अद्यापही निकाल मिळालेला नाही.निकाल काय लागला हे न कळल्यानं पालकांमध्येही नाराजी आहे.
राज्यातील दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 99. 95 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 100 टक्के, मुलांचा निकाल 99.94 टक्के, तर मुलींचा निकाल 99.96 टक्के आहे. दहावीच्या परीक्षेला नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 6 लाख 48 हजार 683 विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. श्रेणी सुधारण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळणार असल्याची माहिती दिनकर पाटील यांनी दिली.
विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल उपलब्ध झाला आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहायला मिळेल. सन 2021 मध्ये इ.10वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील.या वेबसाईटस वर आणि मोबाईल फोनवरुन एसएमएसद्वारे देखील निकाल पाहता येणार आहे.
?निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.
?त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.
?त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.
?त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव सुवर्णा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच SUV असे लिहावे लागेल.
?यानंतर लगेचच तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल.
?निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.
संबंधित बातम्या: