Maharashtra CET 2021 Admit Card 2021 | महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, cetcell.mahacet.org वेबसाईटवर मिळेल सर्व माहिती

| Updated on: Sep 09, 2021 | 9:51 PM

MH CET 2021 Admit Card 2021 | शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहेत. त्यासाठी cetcell.mahacet.org या वेबसाईटवर लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

Maharashtra CET 2021 Admit Card 2021 | महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, cetcell.mahacet.org वेबसाईटवर मिळेल सर्व माहिती
mh cet 2021
Follow us on

Maharashtra CET 2021 Admit Card 2021 | शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता घेण्यात येणाऱ्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहेत. त्यासाठी cetcell.mahacet.org या वेबसाईटवर लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विविध अभ्यासक्रमांसाठीची सामायिक प्रेवश परीक्षा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2021 या कालावधित होणार आहे. (maharashtra cet 2021 admit card 2021 released know all deatils in marathi check out cetcell mahacet org official website)

प्रवेशपत्र कसे डाऊनलोड करावे ?

♦ cetcell.mahacet.org या ऑफिशियल वेबसाईटवर जा

♦ तुम्ही ज्या सामायिक परीक्षेसाठी अर्ज केलेला आहे, त्या परीक्षेसमोरील प्रवेश पत्राच्या ऑप्शनवर क्लिक करा

♦ अर्ज क्रमांक तसेच जन्मतारीख टाकून लॉगिन करा

♦ लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमचे प्रवेशपत्र समोर दिसेल

♦ हे प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्या. परीक्षेसाठी त्याचा उपयोग होईल.

आठ लाख विद्यार्थी परीक्षा देणार

सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी राज्यात एकूण 8 लाख 55 हजार 879 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या प्रवेश परीक्षांसाठी 226 केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. तसेच राज्याबाहेरील केंद्रांच्या संख्येतही या वर्षी वाढ करण्यात आलेली असून आणखी परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

86 टक्के विद्यार्थ्यांना प्रथम विकल्पानुसार परीक्षा केंद्र

86 टक्के विद्यार्थ्यांना प्रथम विकल्पानुसार परीक्षा केंद्र देण्यात आले आहे.  तर 14 टक्के विद्यार्थ्यांना उर्वरित विकल्पानुसार परीक्षा केंद्र उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. प्रवेशाची नोंदणी प्रक्रिया अभ्यासक्रमनिहाय सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरु करण्यात येईल. अभ्यासक्रमनिहाय प्रवेश प्रक्रिया 15 ऑक्टोबर नंतर सुरु करण्यात येणार आहे.

इतर बातम्या :

मराठवाड्यातील शाळांच्या विकासासाठी 200 कोटी, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

NIRF Ranking 2021: केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून एनआआरएफ रँकिंग जाहीर, IIT मद्रास अव्वसस्थानी, महाराष्ट्रातील एक संस्था टॉप टेनमध्ये

NEET UG 2021: नीट यूजी परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर, ड्रेसकोड संदर्भात विद्यार्थ्यांना अलर्ट

(maharashtra cet 2021 admit card 2021 released know all deatils in marathi check out cetcell mahacet org official website)