मुंबई: राज्य सरकारने विविध विद्याशाखांमधील प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी 2021 साठी अर्ज नोंदणी करण्यास पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे. अर्जाची नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने होईल. https://mhtcet2021.mahacet.org या वेबसाईटला भेट देऊन विद्यार्थी आपली नोंदणी करु शकतील.
शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी 2021 या प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आलीय. ऑनलाईन अर्ज न केलेल्या उमेदवारांसाठी एक विशेष बाब म्हणून दिनांक 12/08/2021 ते दिनांक 16/08/2021 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी संधी देण्यात येत आहे. तसेच या पूर्वी नोंदणी केलेल्या उमेदवारांना अर्जामधील दुरूस्ती करण्यासाठी दिनांक 14/08/2021 ते 16/08/2021 या कालावधील संधी देण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी http://mahacet.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असं उदय सामंत म्हणाले आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी २०२१ या प्रवेश परीक्षांकरिता आतापर्यंत ऑनलाईन अर्ज न केलेल्या उमेदवारांसाठी एक विशेष बाब म्हणून
— Uday Samant (@samant_uday) August 10, 2021
MHT CET 2021 साठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम mhtcet2021.mahacet.org. या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
त्यासाठी MHT CET 2021 registration येथे क्लिक करा
त्यानंतर सर्व आवश्यक असलेली माहिती व्यवस्थित भरा आणि सेव्ह वर क्लिक करा.
MHT CET 2021 application form भरण्यासाठी अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाका.
त्यानंतर अर्जासाठीची फी ऑनलाईन पद्धतीने भरून सबमीट या बटणावर क्लिक करा.
तुम्ही भरलेल्या अर्जाची एक प्रिटं काढून घ्या..
इतर बातम्या:
MHT CET Exam: महाराष्ट्रात CET परीक्षा कधी? मंत्री उदय सामंतांनी दिली महत्त्वाची माहिती
Maharashtra CET 2021 Registration Reopens from Today Here How To Apply