अहमदनगरमध्ये बारावीचा पेपर फुटला, दहा वाजताच गणिताचा पेपर उत्तरपत्रिकेसह व्हायरल

| Updated on: Mar 14, 2022 | 1:19 PM

बारावी गणित (Mathematics) विषयाचा पेपर फुटल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. सकाळी 10 वाजताच गणिताचा पेपर उत्तरपत्रिकेसह (Answer sheet) सोशल मीडियावर व्हायरल झाला असल्याची चर्चा रंगत आहे. शिक्षणाधिकारी श्रीगोंद्यात दाखल झाले आहेत. कुठल्या परीक्षा केंद्रावरून पेपर फुटला याचा तपास सध्या सुरू आहे.

अहमदनगरमध्ये बारावीचा पेपर फुटला, दहा वाजताच गणिताचा पेपर उत्तरपत्रिकेसह व्हायरल
बारावी गणिताचा पेपर उत्तरपत्रिकेसाहित सोशल मीडियावर व्हायरल
Image Credit source: TV9
Follow us on

अहमदनगर : बारावी गणित (Mathematics) विषयाचा पेपर फुटल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. सकाळी 10 वाजताच गणिताचा पेपर उत्तरपत्रिकेसह (Answer sheet) सोशल मीडियावर व्हायरल झाला असल्याची चर्चा रंगत आहे. शिक्षणाधिकारी श्रीगोंद्यात दाखल झाले आहेत. कुठल्या परीक्षा केंद्रावरून पेपर फुटला याचा तपास सध्या सुरू आहे. मात्र, सकाळी 10 वाजताच उत्तरपत्रिकेसह पेपर सोशल मीडियावर (Social media) बघितल्यानंतर आर्श्चय व्यक्त केले जात आहे. मात्र, या पेपर फुटीचा विद्यार्थ्यांना काय फटका बसतो हे पाहण्यासारखे आहे.

अहमदनगरमध्ये बारावी गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा 

काही वेळे अगोदरच राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेमध्ये माहिती देत असताना सांगितले होते की, राज्यामध्ये कुठेही पेपर फुटला नाहीये. मात्र, सोशल मीडियावर तर गणिताचा पेपर उत्तरपत्रिकेसह व्हायरल झालेला दिसतो आहे. मुंबईमधील साठे कॉलेजमध्ये केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता आणि त्या पाठोपाठ आता अहमदनगरमध्ये देखील गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा आहे.

इथे पाहा बारावी गणिताचा व्हायरल झालेला पेपर! 

मुंबईमध्ये केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याची चर्चा

मुंबईच्या पेपर फुटीसंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते की,  पेपर फुटला, असा चुकीचा प्रचार काही समाजमाध्यामातून सुरू आहे. याप्रकरणात शिक्षणमंत्री यांनी विधानपरिषदेमध्ये निवेदन देखील दिले आहे. आता बारावीच्या या गणिताच्या पेपर संदर्भात शिक्षणमंत्री काय बोलतात. याकडे राज्यातील विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे मुंबईमध्ये तर पेपर फुटीसंबंधात एका खासगी शिकवणीच्या चालकाला अटक देखील करण्यात आल्याची चर्चा आहे.

संबंधित बातम्या : 

धक्कादायक…! खासगी शिकवणीच्या शिक्षकाने फोडला बारावी केमिस्ट्रीचा पेपर!

SSC Exam : दहावीच्या परीक्षांना 15 मार्चपासून सुरुवात, बोर्डाची जय्यत तयारी, जाणून घ्या संपूर्ण माहिती