मुंबई: आयटीआयच्या प्रवेशाची मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता आयटीआयच्या उर्वरित जागांवर 18 नोव्हेंबरपर्यंत प्रवेश घेण्यात येणार आहे. यापूर्वी आयटीआय प्रवेशासाठी 30 ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली होती. आयटीआयच्या महाराष्ट्रातील 90 टक्के जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. महाराष्ट्रात यंदा केंद्रीय प्रवेश प्रक्रिया पद्धतीनं विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात यंदा आयटीआय प्रवेशांना विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात 83 हजार 744 विद्यार्थ्यांनी शासकीय आटीआय संस्थांमध्ये तर खासगी आयटीआयमध्ये 27784 प्रवेश घेतला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याचं चित्र आहे. 2020 मध्ये आयटीआयला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आयटीआयला प्रवेश घेतला आहे.
राज्यात 417 शासकीय आयटीआय आहेत तर 550 खासगी आयटीआय आहेत. शासकीय आयटीआयची प्रवेश क्षमता एक लाख तर खासगी संस्थांची प्रवेश क्षमता 45 हजार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आयटीआय प्रवेशांमध्ये वाढ झाली आहे.
आयटीआयच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा असल्यास विद्यार्थी https://admission.dvet.gov.in/ या वेबसाईटवर नोंदणी करुन अर्ज सादर करु शकतात. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. विद्यार्थी महाआयटीआय या प्ले स्टोअरवरील अॅपचा देखील वापर करु शकतात.
इतर बातम्या:
IND vs NZ : या पराभवाचा खूप त्रास होईल; सेहवाग टीम इंडियावर बरसला, अझहरची कोचिंग स्टाफवर टीका
देवेंद्र फडणवीसांवर मलिकांचा गंभीर आरोप, पंकजा मुंडे म्हणतात, ‘हे अत्यंत हास्यास्पद’
Maharashtra DVET extended Last date for ITI admissions to November 18 check details here