मुंबई: राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं (National Child Award) वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं. देशभरात एकूण 32 बालकांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील शिवांगी काळे, जुई केसकर, जिया राय, स्वयम पाटील या मुलांचा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळवल्याबद्दल महाराष्ट्राच्या या चारही जणांवर कौतुकाचा वर्षावर होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), शालेयय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या बालकांचं विशेष कौतुक केलं आहे. महाराष्ट्र ही शूरांची-वीरांची, कर्तृत्ववानांची, नवनिर्माणाचा ध्यास असलेल्यांची भूमी आहे. ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्या बालकांनी हे पुन्हा एकदा सिध्द केलं आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी या मुलांचं कौतुक केलं आहे.
शिवांगी काळे हिन विजेच्या धक्क्यापासून आई आणि बहिणीला वाचवलं होतं. त्यानिमित्त शिवांगी काळे हिचा शौर्य पुरस्कारानं सन्मान करण्यात आला होता. तर, जुई अभिजीत केसकर हिला नवीन संशोधन गटातून पुरस्कार मिळाला आहे. तिनं पार्किन्सनच्या रुग्णांचे थरथरणे मोजणाऱ्या यंत्राचा शोध लावला होता. स्वंय पाटील यांला क्रीडा गटात पुरस्कार मिळाला आहे. दिव्यांग असूनही समुद्रात 14 किमी पोहून विश्वविक्रम नोंदवला होता. जिया राय हिचा देखील क्रीडा गटात पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. जिया राय हिनं दिव्यांग अशूनही ओपन वॉटर स्वीमिंगमध्ये 8 तास 40 मिनिटात 36 किमी पोहून विश्वविक्रम केला होता. या कामगिरीबद्दल प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देऊन चार जणांचा सन्मान करण्यात आला आहे.
पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार पटकावणाऱ्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन ! महाराष्ट्रातून शिवांगी काळे, जुई केसकर, जिया राय आणि स्वयम पाटील यांनी पुरस्कार मिळवून महाराष्ट्राची शान वाढविली, त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक. pic.twitter.com/jTh2odKPPe
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) January 24, 2022
महाराष्ट्रातील शिवांगी काळे, जुई केसकर, जिया राय, स्वयम पाटील या बालकांसह देशातील ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्या सर्व बालकांचं मनःपूर्वक अभिनंदन! पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा!, असं अजित पवार यांनी म्हटलंय. महाराष्ट्र ही शूरांची-वीरांची, कर्तृत्ववानांची, नवनिर्माणाचा ध्यास असलेल्यांची भूमी आहे. ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्या बालकांनी हे पुन्हा एकदा सिध्द केलं आहे. या बालकांची कामगिरी अन्य बालकांसह सर्वांना राष्ट्रनिर्मितीसाठी प्रेरणा देणारी ठरेल, अशा शब्दात अजित पवार यांनी या मुलांचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्राच्या बालकांनी प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे. जळगाव येथील शिवांगी काळे हिनं वीरता श्रेणीमध्ये, पुण्याच्या जुई केसकर हिनं नवसंशोधनमध्ये, मुंबईतील जिया राय तसंच नाशिकच्या स्वयंम पाटीलनं क्रीडा श्रेणीमध्ये ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ मिळवला आहे. या पुरस्कार विजेत्या बालकांमुळे महाराष्ट्राचा सन्मान वाढला आहे. या बालकांच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या त्यांच्या पालकांचं, शिक्षकांचं, नातेवाईकांचं, मार्गदर्शकांचं, हितचिंतकांचंही मनापासनं अभिनंदन करतो, असं अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्रातील शिवांगी काळे, जुई केसकर, जिया राय, स्वयम पाटील या बालकांसह देशातील ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्या सर्व बालकांचं मनःपूर्वक अभिनंदन! पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा!
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 24, 2022
25 January 2022 Panchang | 25 जानेवारी 2022, मंगळवारचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहुकाळ
Nagpur bird | तलावातील प्लास्टिक पक्ष्यांच्या जीवावर, नागपुरातील पक्ष्यांना नेमका धोका काय?
Maharashtra four Childs received PM National Child Awards from Narendra Modi in Online Function