मुंबई: कोरोना विषाणू संसर्गामुळं यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. महाराष्ट्र सरकारनं अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचं जाहीर केलं आहे. अकरावी प्रवेशाच्या सीईटीसाठी नोंदणी करण्याची मुदत 2 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी अकरावी सीईटीसाठी नोंदणी करण्याची मुदत 26 जुलै पर्यंत होती.
दहावी उत्तीर्ण झालेल्या ज्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा द्यायची आहे. ते विद्यार्थी सीईटी परीक्षेची नोंदणी आज दुपारी तीन वाजल्यानंतर करु शकतात सांगण्यात आलं होतं. मात्र, अद्यापही वेबसाईट बंद असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नोंदणीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अकरावी प्रवेशाची सीईटी परीक्षा 21 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
अकरावी प्रवेशाच्या सीईटी परीक्षेसाठी नोंदणी सुरु झाल्यानंतर पहिल्या दिवशी एक लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. विद्यार्थी मोठ्या प्रमाणात नोंदणी करत असल्यानं सीईटी नोंदणीच्या वेबसाईटमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे गेले काही दिवस वेबसाईट नोंदणीसाठी बंद ठेवण्यात आली होती. आता, वेबसाईटवर पुन्हा एकदा नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सीईटी परीक्षा 21 ऑगस्ट रोजी घेण्याचं निश्चित केलं आहे. बोर्डानं सीईटी परीक्षा ऑफलाईन घेण्याचं जाहीर केलं आहे. मात्र, विद्यार्थ्यांपर्यंत सीईटी परीक्षेची सविस्तर माहिती न पोहोचल्यानं परीक्षा ऑफलाइन की ऑनलाईन यावरुन विद्यार्थ्याच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे.
सीईटी परीक्षा 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत घेतली जाईल. इंग्रजी, गणित (भाग 1 व 2), विज्ञान आणि तंत्रज्ञान (भाग 1 व 2) सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या प्रत्येक घटकावर प्रत्येकी 25 गुणांचे एकूण 100 बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) विचारले जाणार आहेत. कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी विषयनिहाय 25 टक्के अभ्यासक्रम वगळण्यात आला असून या अभ्यासक्रमावर सीईटीमध्ये प्रश्न विचारले जातील. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अकरावी सीईटीसाठी परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही. मात्र, सीबीएसईसह इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेसाठी 178 रुपये शुल्क भरावे लागेल.
इतर बातम्या:
Maharashtra FYJC CET 2021: अकरावीच्या सीईटी परीक्षेसाठी पहिल्याच दिवशी एक लाख विद्यार्थ्यांचे अर्ज
Maharashtra FYJC CET 2021 for class 11th admission registration dates extended till 2 August