मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बाराावीचा निकाल दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहे. बारावीच्या निकालाच्या निमित्तानं टीव्ही 9 मराठीनं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी बातचीत केली. मागच्या वेळचा अनुभव बघता आपण पूर्ण तयारी केलेली आहे. यावेळी आम्ही पाच लिंक देत आहोत. तांत्रिक लोकांशी चर्चा करुन पूर्ण काळजी घेत आहोत. बारावीच्या निकालाच्या वेळी व्यवस्थापन करण्यास बोर्डाला सांगितलं आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना निकालासाठी शुभेच्छा देते. विद्यार्थ्यांनी भविष्यात महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवावा, असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.
ग्रामीण भागात शाळा सुरु केलेल्या आहेत. आमचा प्रयत्न आहे की गेल्या दीड वर्षांपासून मुलं घरी आहेत. मुलं घरी बसून वैतागली आहेत, त्यांना घराबाहेर पडावं असं वाटत आहे. पालकांचीही मागणी शाळा सुरु करण्यासंदर्भात आहे. शहरी भागातील शाळा सुरु करण्यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे फाईल दिली आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. काही ठिकाणी आणि मुंबईत नियम शिथील झालेत, तिथे टप्याटप्याने शाळा सुरू करण्यात येतील.
पूरग्रस्त भागात शालेय पाठ्यपुस्तकं भिजली आहेत, पोषक आहार भिजलाय, ग्रामीण भागात काय नवं मॉडेल वापरता येईल, हा मोठा प्रश्न आहे. परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न सुरू, त्यानंतर महत्वाचा निर्णय होईल, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या
विद्यार्थी त्यांचा निकाल https://hscresult.11 thadmission.org.in, https://msbshse.co.in , hscresult.mkcl.org आणि mahresult.nic.in. या वेबसाईटवर निकाल पाहू शकतात.
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी बोर्डानं दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर भेट द्यावी.
त्यानंतर तुम्हाला HSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.
त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.
त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव रेश्मा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच RES असे लिहावे लागेल.
यानंतर लगेचच तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर पाहाता येईल
निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.
बारावी निकालासंदर्भात जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाला सर्वाधिक वेटेज दिलं गेलं आहे. बारावी निकाल जाहीर करण्यासाठी महाविद्यायांना या शासन निर्णयाचा आधार घ्यावा लागणार आहे. बारावीच्या परीक्षेला बसलेले खासगी विद्यार्थी, पुन्हा परीक्षा देणारे विद्यार्थी यांच्यासाठी वेगळा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. त्यासंबंधी अधिक माहिती शासन निर्णयात पाहायला मिळेल.
इतर बातम्या: