मुंबई : एमपीएससीची परीक्षा (MPSC exam) देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commission) गट ब 2020 च्या पूर्व परीक्षेचे हॉल तिकीट (Holtkit) विद्यार्थांना ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहे. आजपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवरून विद्यार्थांना ऑनलाईन हॉल तिकीट डाऊनलोड करता योणार आहे. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने माहिती देण्यात आली आहे. 26 फेब्रुवारी रोजी राज्यभरातील विविध केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. संबंधित परीक्षेचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून, कोरोनाचे संकट लक्षात घेता कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात आली आहे. या संदर्भात आयोगाकडून एक ट्विट करण्यात आले असून, परीक्षेला येताना तसेच हॉलतिकीट डाऊनलोड करताना काय काळजी घ्यावी याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
गट ब संयुक्त पूर्व परीक्षा येत्या 26 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. या परीक्षा वेळेतच होणार असून, संबंधित परीक्षेचे हॉल तिकीट वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. संबंधित विद्यार्थांनी आपले हॉल तिकीट वेबसाईटवरून डाऊनलोड करून घ्यावे. हॉल तिकीट डाऊनलोड करण्यास काही अडचणी आल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा. संभाव्य मोर्चे, आंदोलने, वाहतूक कोंडी अशा विविध समस्या लक्षात घेता विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेआधी केंद्रावर दीड तास अधी हजर व्हावे. कोणत्याही कारणामुळे परीक्षेसाठी उशीर झालेल्या विद्यार्थाला परीक्षेला बसता येणार नाही याची नोंद घ्यावी अशा विविध सूचना आयोगाकडून करण्यात आल्या आहेत.
दरम्यान परीक्षा केंद्रावर कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन आयोगाकडून विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. परीक्षेचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. कोरोना महामारीची पार्श्वभूमी लक्षात घेता कोरोना नियमांचे काटोकोरपणे पालन करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाच्या वतीने देण्यात आली आहे.
आयोगामार्फत दिनांक 26 फेब्रुवारी, 2022 रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक जारी करण्यात आले आहे. pic.twitter.com/ZzkmPHAaoK
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) February 17, 2022
HSC SSC Exam : दहावी बारावीच्या परीक्षांची जोरदार तयारी, अमरावतीमध्ये केंद्रांची संख्या चौपट