मुंबई : राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad ) यांनी कोरोना रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी शाळा (School Reopen) सुरु करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिल्याचं सांगितलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनंतर कोरोनाची स्थिती पाहून शाळा सुरु करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. राज्यातील ठिकठिकाणी कोरोना स्थितीचा आढावा घेऊन स्थानिक प्रशासनाकडून निर्णय घेण्यात येत आहेत. सोलापूर (Solapur) शहरातील शाळा सोमवारी सुरू होणार नाहीत, अशी माहिती महापालिकेच्या वतीनं देण्यात आलीय. पॉझिटिव्ह दर वाढल्याने पालिकेच्यावतीनं हा निर्णय घेण्यात आलाय. बुलडाणा जिल्ह्यात देखील सोमवारपासून शाळा सुरु करण्यात येणार नसल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आढावा घेत दहावी ते बारावीच्या वर्गांना परवानगी देण्यात आली आहे.
सोलापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्यामुळे येत्या सोमवारीपासून शाळा सुरू न करण्याचा निर्णय महापालिकाने घेतला आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी सकाळी शिक्षण मंडळाचे प्रशासनधिकारी कादर शेख यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. सोलापूर शहरातील पॅझिटिव्हटी दर वीस टक्याहून अधिक असल्याने सोमवार पासून शाळा सुरू करू नयेत, असे आदेश त्यांनी दिले आहेत. एक आठवड्यानंतर परस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल असेही आयुक्तांनी स्पष्ट केले
सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. मात्र बीड जिल्ह्यामध्ये कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने केवळ दहावी आणि बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. काल झालेल्या शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीत जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी दोघेही उपस्थित होते. आणखी दोन ते तीन दिवस पॉझिटीव्ह रुग्णांचा रेट काय राहतो, त्यानंतर शाळा सुरु करायच्या की नाही याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. 26 जानेवारी नंतरच जिल्ह्यातील शाळांबाबत निर्णय होईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षण अधिकारी अजित बहिर यांनी दिलीय.
शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय हा जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्या त्या जिल्ह्यातील परिस्थितीनुसार घ्यायचा आहे असे शासनाचे निर्देश आहेत. बुलडाणा जिल्ह्यात सध्या पॉझिटिव्ह केसेस मोठ्या प्रमाणात येत असल्याने तसेच पॉझिटिव्हीटी रेट सुध्दा जास्त असल्याने सोमवार पासून शाळा सुरु करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी काढलेला नाही. त्यामुळे जो पर्यंत जिल्हाधिकारी हे शाळा सुरु करण्याबाबतचा आदेश काढणार नाहीत तोपर्यंत शाळा बंद राहतील, असं बुलडाण्याचे निवासी उप जिल्हाधिकारी यांनी सांगितलं आहे.
इतर बातम्या:
Video : लढवली अनोखी शक्कल आणि भागवली आपली तहान; पाहा, या कावळ्यानं कसं चालवलं डोकं…
Maharashtra School Reopen Buldana and Solapur schools were closed only hsc and ssc classes are open