Maharashtra School Reopen: पहिली ते सातवीचे वर्ग सुरु होणार? ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता

| Updated on: Nov 25, 2021 | 8:59 AM

शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला राज्याच्या आरोग्य विभागानं परवानगी दिलेली आहे. याशिवाय चाईल्ड टास्क फोर्सनं देखील शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

Maharashtra School Reopen: पहिली ते सातवीचे वर्ग सुरु होणार? ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता
शाळा
Follow us on

मुंबई: महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यानंतर शाळा बंद करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण संख्या जसजशी कमी होऊ लागली त्याप्रमाणं शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र, पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्यात आले नव्हते. राज्याच्या शिक्षण विभागानं आता पहिली पासून सर्व वर्ग सुरु करण्यासंदर्भात हालचाली सुरु केल्या आहेत. प्राथमिक शाळा ऑफलाईन पद्धतीनं सुरु करण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागानं मांडला असून आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यत आहे. शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला राज्याच्या आरोग्य विभागानं परवानगी दिलेली आहे. याशिवाय चाईल्ड टास्क फोर्सनं देखील शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

चाईल्ड टास्क फोर्सची शाळा सुरु करण्यास मान्यता

महाराष्ट्र सरकारच्या चाईल्ड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. सुहास प्रभू यांनी पहिली पासूनचे वर्ग सुरु करण्यामध्ये उशीर करण्यासारखं कोणतंही कारण नसल्याचं म्हटलं. ग्रामीण भागात सध्या पहिली ते चौथी तर शहरी भागात पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग ऑफलाईन पद्धतीनं सुरु नाहीत. शाळा सुरु करताना कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्यात यावं अशा सूचना चाईल्ड टास्क फोर्सनं दिल्या आहेत. सुहास प्रभू यांनी कोरोनाच्या काळात काही शालेय विद्यार्थ्यांना मानसिक सामोरं जावं लागल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं ऑफलाईन शाळा सुरु करण्यात याव्यात अशी भूमिका त्यांनी मांडली.

टास्क फोर्सचे दुसरे सदस्य डॉ. विजय येवले यांनी देखील डॉ. सुहास प्रभू यांच्यासारखं मत माडंलं आहे. पहिली ते सातवीचे वर्ग सुरु करण्यासाठी लसीकरणाची वाट पाहण्याची गरज नाही. पहिली ते सातवीचे वर्ग सुरु करण्यात यावेत, असं सरकारला कळवल्याचं सांगितलं आहे.

आज निर्णय होण्याची शक्यता

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील शाळा सुरु करण्याच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याचं सांगितलं आहे. आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित राहिल्यास यासंदर्भातील निर्णय होईल, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील बुधवारी पत्रकार परिषद घेत पहिली ते सातवीचे वर्ग सुरु करण्यास आरोग्य विभागाची परवानगी असल्याचं म्हटलं होतं. यामुळं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्यासंदर्भातील मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या:

यशवंतराव चव्हाणांनी मोफत शिक्षणाच्या योजनेसाठी मुख्यमंत्रिपद पणाला लावलं, ईबीसीच्या निर्णयानं महाराष्ट्रातील पिढ्या घडल्या

Maharashtra School Reopen : मोठी बातमी, पहिली ते सातवीचे वर्ग सुरु होणार, आरोग्य विभागाची परवानगी, राजेश टोपेंची माहिती

Maharashtra School Reopen Thackeray Government may take decision today to start classes first to seven