मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी तसेच बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. दुपारी एक वाजता www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर हा निकाल जाहीर झाला. दहावी आणि बारावीचा निकाल विशेष मूल्यांकन सूत्रानुसार जाहीर करण्यात आला होत्या त्यामुळं यंदा पुरवणी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फार कमी होती.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापुर अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत इयत्ता दहावीची पुरवणी परीक्षा दिनांक 22 सप्टेंबर 2021 ते 8 ऑक्टोबर 2021 व इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा दिनांक 16 सप्टेंबर 2021 ते 12ऑक्टोबर 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे.
www.mahresult.nic.in
निकाल कसा पाहाल ?
?निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या वेबसाईटवर जा.
?त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.
?त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.
?त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव सुवर्णा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच SUV असे लिहावे लागेल.
?यानंतर लगेचच तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल.
?निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या इ.१० वी व इ.१२ वी पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या दि.२० ऑक्टोबर रोजी दु.१:००वा.www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा! pic.twitter.com/STx1LGb5ai
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) October 19, 2021
ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून इ. दहावी व इ. बारावी पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयाव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून इ. दहावीसाठी http://verification.mh-ssc.ac.in व इ. बारावीसाठी http://verification.mh-hsc.ac.in स्वतः किंवा शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी/ शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी गुरुवार दिनांक 21 ऑक्टोबर 2021 ते शनिवार दिनांक 30 ऑक्टोबर 2021 पर्यंत व छायाप्रतीसाठी गुरूवार, दिनांक 21 ऑक्टोबर 2021 ते मंगळवार 9 नोव्हेंबर 2-21 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरता येईल.
संबंधित बातम्या:
maharashtra ssc hsc exam result 2021: दहावी-बारावीचा पुरवणी परीक्षेचा निकाल कुठे आणि कसा पाहायचा?
Maharashtra ssc hsc board supplementary exam 2021 result declared live updates how to check result on www maharesult nic in