मुंबई : दहावीच्या निकालाचे संकेतस्थळ लवकरच पूर्ववत सुरू करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. संकेतस्थळ लवकरच पूर्ववत सुरू होऊन विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल बघता येईल असा दिलासा त्यांनी दिला आहे. माध्यमिक शालांत परीक्षेच्या संकेतस्थळावर अचानक भेट देणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे संकेतस्थळ काही काळासाठी क्रॅश झाल्याने विद्यार्थांना आपला निकाल बघता आला नाही. या सर्व तांत्रिक बिघाडाची चौकशीचेही प्रा. गायकवाड यांनी निर्देश दिले आहेत.
राज्यातील दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहायला मिळणार होता, मात्र, दोन्ही वेबसाईट डाऊन झाल्या आहेत. वेबसाईट पूर्ववत झाल्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल पाहायला मिळेल. तब्बल चार तासांहून अधिक वेळ झाला तरी तरी वेबसाईट डाऊन आहेत. यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी यासंदर्भात संताप व्यक्त केला आहे. तर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. दहावीच्या निकालाची वेबसाईट सुरु करण्यासाठी एसएससी बोर्डाचे प्रयत्न सुरु आहेत. बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील आणि तांत्रिक सदस्यांची बैठक सुरु आहे.
सन 2021 मध्ये इ.10वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील. असं सांगण्यात आलं होतं. मात्र, दोन्ही वेबसाईट डाऊन झाल्या आहेत. दहावीच्या परीक्षेला नोंदणी केलेल्या एकूण 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 6 लाख 48 हजार 683 विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. श्रेणी सुधारण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळणार असल्याची माहिती दिनकर पाटील यांनी दिली. पुण्यात
दहावीच्या निकालाच्या दोन्ही साईट तासाभरापासून बंद असल्यानं अनेक मुलांची निराशा झाली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून निकालासाठी दोन साईट देण्यात आल्या होत्या. मात्र या साईट क्रॅक झाल्यामुळे अद्यापही निकाल मिळालेला नाही.निकाल काय लागला हे न कळल्यानं पालकांमध्येही नाराजी आहे.
राज्यातील दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 99. 95 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 100 टक्के, मुलांचा निकाल 99.94 टक्के, तर मुलींचा निकाल 99.96 टक्के आहे. दहावीच्या परीक्षेला नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 6 लाख 48 हजार 683 विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. श्रेणी सुधारण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळणार असल्याची माहिती दिनकर पाटील यांनी दिली.