MBBS च्या जागा आता वाढणार, केंद्राने दिली इतक्या नव्या मेडीकल कॉलेजना मंजूरी

| Updated on: Jun 09, 2023 | 1:18 PM

देशातील मेडीकल कॉलेजाच्या जागा वाढणार आहेत. त्यामुळे एमबीबीएस बनण्यासाठी NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

MBBS च्या जागा आता वाढणार, केंद्राने दिली इतक्या नव्या मेडीकल कॉलेजना मंजूरी
MBBS STUDENT
Image Credit source: shutterstock
Follow us on

दिल्ली :डॉक्टर होणे हे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी अनेक जण एमबीबीएसची ( MBBS ) तयारी करीत असतात. परंतू मेडीकल कॉलेजाची ( Medical College ) संख्या कमी असल्याने मेडीकलच्या जागा कमी असल्याने स्पर्धा प्रचंड निर्माण झालेली आहे. त्यामुळे मेडीकलच्या विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे कॉलेज मिळत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने ( Central Government ) आता मेडीकल कॉलेजांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. नेमकी किती मेडीकल कॉलेजाना सरकारने मंजूरी दिली आहे ते पाहूया…

देशातील मेडीकल कॉलेजांची संख्या वाढली

देशातील मेडीकल कॉलेजाच्या जागा वाढणार आहेत. त्यामुळे एमबीबीएस बनण्यासाठी NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. देशात आता पन्नास नविन मेडीकल कॉलेज सुरु होणरा आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने त्यासाठी मंजूरी दिली आहे. आता मेडीकलच्या जागामध्ये वाढ होणार आहे. देशात आता एकूण मेडीकलच्या कॉलेजांची संख्या आता 702 झाली आहे. त्यामुळे एमबीबीएसच्या जागांची संख्या आता 1,07,658 इतकी झाली आहे.

या राज्यात नवीन मेडीकल कॉलेज

देशात 50 नवीन मेडीकल कॉलेजना परवानगी देण्यात आली आहे. यातील तेलंगणात 13 मेडीकल कॉलेज, राजस्थानात आणि आंध्र प्रदेशात प्रत्येकी 5, महाराष्ट्रामध्ये 4, आसाम, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात राज्यात प्रत्येकी 3 मेडीकल कॉलेज, हरीयाणा, ओदिशा आणि जम्मू – कश्मीरमध्ये प्रत्येकी 2, आणि मध्य प्रदेश आणि नागालॅंडमध्ये प्रत्येकी 1 अशा मेडीकल कॉलेजांचा समावेश आहे.

नीटचा रिझल्ट लवकरच

NEET परीक्षेचा निकाल लवकरच लागणार आहे, उत्तर पत्रिका याआधीच जाहीर करण्यात आल्या आहेत. आता यानंतर लवकरच निकाल अपेक्षित आहे. त्यानंतर काऊन्सिलींग प्रक्रिया सुरू होणार आहे. नीट काऊन्सिलींगची माहीती अधिकृत वेबसाईटवर दिली जात असते.