मुंबई : महाराष्ट्र राज्य सीईटी सेलने एमएच लॉ (MH CET LAW) परीक्षेसाठी अर्ज (APPLICATION) करण्याची मुदत पुढे ढकलली आहे. लॉ (LAW) च्या 3 वर्षे आणि 5 वर्षाच्या अभ्यासक्रमासाठीची ही प्रवेश परीक्षा असते. आता विद्यार्थी 3 वर्षाच्या एमएच लॉ सीईटीसाठी 29 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात आणि 5 वर्षाच्या एमएच लॉ सीईटीसाठी 2 मे 2022 रोजी अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. cetcell.mahacet.org या लिंकवर जाऊन अर्ज भरता येऊ शकतो. 5 वर्षे अभ्यासक्रमाची एलएलबी सीईटी परीक्षा 10 ते 18 आणि 19 जून 2022 पर्यंत पुढे ढकलली आहे. 3 वर्षे अभ्यासक्रमाची एलएलबी सीईटी मात्र दिलेल्या वेळापत्रकानुसारच घेतली जाणार आहे.
General Category Candidates – 800/- Rs
SC/ST Category Candidates – 400/- Rs
रिपोर्ट्सनुसार नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज (NLU) 19 जून 2022 रोजी क्लॅट 2022 परीक्षा घेणार आहे. क्लॅट आणि 5 वर्षे अभ्यासक्रमाची एमएच सीईटी लॉ अशा दोन परीक्षांची एकाच दिवशी टक्कर होऊ शकते. त्यामुळे एमएच सीईटी लॉ 2022 साठी अर्ज करताना क्लॅट परीक्षेचा विचार करून उमेदवारांना अर्ज भरावा लागणार आहे. एमएच सीईटी लॉ ही परीक्षा महाराष्ट्रातील विधी महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी घेतली जाते. क्लॅट परीक्षा ही नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज मध्ये प्रवेश घेण्यासाठी उपयोगी ठरते.
इतर बातम्या :