मुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र ने MHT CET 2023 समुपदेशन वेळापत्रक जाहीर केले आहे. उमेदवार cetcell.mahacet.org अधिकृत वेबसाइटवर जारी केलेला समुपदेशन कार्यक्रम पाहू शकतात. कोणत्या अभ्यासक्रमाच्या समुपदेशन नोंदणीसाठी कोणता दिवस देण्यात आलाय ते या वेळापत्रकात देण्यात आलेलं आहे.
यंदा एमएचटी सीईटीसाठी 6.36 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी पीसीएम (फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स) गटाची सीईटी परीक्षा 9 ते 13 मे 2023 या कालावधीत घेण्यात आली होती, त्यासाठी 3,03,048 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती आणि त्यापैकी 2,77,403 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
PCB (फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी) गटासाठी सीईटी परीक्षा 2023 ते 15 मे 20 दरम्यान घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी 3,33,041 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर 3,13,732 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. विद्यार्थ्यांनी नोंदणीपूर्वी जारी केलेली अधिसूचना वाचावी आणि नियमानुसार नोंदणी करावी. अर्ज करताना सर्व माहिती अचूक आणि व्यवस्थित भरावी लागते.
महाराष्ट्र सीईटी 2023 चा निकाल 12 जून रोजी जाहीर झाला होता. ही नोंदणी प्रक्रिया 8 मार्च ते 15 एप्रिल पर्यंत चालली. समुपदेशन प्रक्रियेबद्दल अधिक माहितीसाठी, विद्यार्थी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.