MPSC Exam : तयारीला लागा! महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षेसंदर्भात आयोगाकडून महत्त्वाची अपडेट

| Updated on: Oct 20, 2021 | 11:36 AM

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात आयोगानं महत्त्वाची माहिती दिली आहे.

MPSC Exam : तयारीला लागा! महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षेसंदर्भात आयोगाकडून महत्त्वाची अपडेट
एमपीएससी
Follow us on

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात आयोगानं महत्त्वाची माहिती दिली आहे. 4 सप्टेंबरला झालेल्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षेची उत्तर तालिका तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. गट ब संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालानंतर जानेवारी 2022 मध्ये मुख्य परीक्षा आयोजित केली जाणार आहे, असल्याचं आयोगाकडून ट्विटद्वारे सांगण्यात आलं आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळं 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मुख्य परीक्षा

एमपीएससीकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 ची उत्तरतालिका प्राथम्याने अंतिम करण्यात येत आहे. एमपीएससीकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त मुख्य परीक्षा जानेवारी 2022 च्या दुसऱ्या आठवड्यानंतर घेण्यात येतील, असं आयोगाकडून कळवण्यात आलं आहे.

कोरोनामुळे पूर्व परीक्षा संप्टेंबरमध्ये

मार्च महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षेनंतर अनेक विद्यार्थ्यांना कोरोना विषाणू संसर्ग झाला होता. त्यामुळे पुणे, मुंबईसह राज्यात आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता आता 4 सप्टेंबरला परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

390 पदांसाठी राज्य सेवा परीक्षेची जाहिरात

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात प्रसिद्ध केली होती. राज्य सेवा परीक्षा 2021 अंतर्गत 290 पदांसाठी 16 संवर्गात भरती होणार होती. एमपीएससीकडून पदसंख्येमध्ये वाढ करण्यात आली. 100 पदं वाढल्यामुळं आता 390 पदांसाठी 2 जानेवारी 2022 ला एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल. पदांच्या संख्येत वाढ झाल्यानं विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.

इतर बातम्या:

MPSC कडून मोठी अपडेट, ऑनलाईन अर्ज प्रणाली अपग्रेड होणार, आयोगाकडून ट्विटद्वारे माहिती

MPSC PSI Physical Test Date | एमपीएससीकडून पीएसआय पदासाठी शारीरिक चाचणीची तारीख जाहीर, तब्बल दोन वर्षानंतर मुहूर्त

MPSC said combined main exam of group b will conduct in second week of January